चाकूर नगर पंचायतीत 1कोटी 61 लाखांच्या विकास कामांचा खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते शुभारंभ

चाकूर नगर पंचायतीत 1कोटी 61 लाखांच्या  विकास कामांचा 
 खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते शुभारंभ





(लातुर-प्रतिनिधी)--    चाकूर नगर पंचायतीने  1कोटी 61 लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या अनेक विकास कामांचा शुभारंभ खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते केला आहे.  रस्ते,पथदिवे,पाणी,सभागृह बांधकाम यावर चाकूर नगर पंचायतीने जास्तीत जास्त खर्च करायचे ठरवले आहे. या उदघाटन कार्यक्रमास खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके,किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख,नगराध्यक्ष कपिल माकणे, उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार, विठ्ठलराव माकणे,गोविंदराव माकणे,मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे हे प्रामुख्याने उपस्थित होते.   




यावेळी बोलताना खासदार सुधाकर शृंगारे यांनी चाकूरच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू,केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे म्हंटले आहे. पुढे बोलताना खासदार सुधाकर शृंगारे म्हणाले की, लातुर जिल्ह्याचे जलसिंचन वाढवण्याचा आमचा  प्रयत्न आहे. अटल भूजल योजनेतून लातुर जिल्ह्याला जवळपास 300 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. चाकूर बस स्थानकाची नव्याने उभारणी करणे, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणे,सभागृह बांधकाम करणे अश्या अनेक विकास कामांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार शृंगारे यांनी दिले आहे. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह ,आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,प्रवक्ते गणेश हाके,नगराध्यक्ष कपिल माकणे यांची भाषणे झाली. चाकूर नगर पंचायतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

أحدث أقدم