भारत जोडो यात्रेत जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या नियोजनातून 20 हजार कार्यकर्ते सहभागी
यात्रेने काॅग्रेस मध्ये नवचैतन्य
औसा (प्रतिनिधी)-भारत जोडो यात्रेत माजी पालकमंत्री आ. अमित देशमूख व लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन धिरज देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी संपुर्ण जिल्ह्यातील कॉग्रेस पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना देशाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेत्रत्वात भारत जोडो यात्रा हिंगोली येथे 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली येथे आल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी सत्य संयम आणि सदाचार हा विचार घेऊन देशाला समानतेचा संदेश देत द्वेषाच्या राजकारणातून देश मुक्त करण्यासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे काँग्रेस पक्षाचे नेते खा राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून - काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली आहे.या यात्रेतून देशवासीयांना राष्ट्रीय एकात्मता अखंडतेचा संदेश दिला जात आहे श्रीशैल उटगे यांच्या नियोजनाखाली लातूर जिल्ह्यातून सुमारे 15-20हजार कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेमध्ये उत्कृष्ट नियोजन बध्द पध्दतीने सहभाग नोंदविला .लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित भैया देशमुख आणि युवकांचे नेते आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाचा आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचा आदर करून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी लातूर जिल्ह्यातून खा राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचे शिस्तबद्ध नियोजन केले. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये खा राहुल गांधी यांचे लातूर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व स्वागत केले. खा राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत पायी चालत काढलेल्या पदयात्रेस अभुतपूर्व प्रतिसाद मिळत असून ही पदयात्रा आता मध्य भारतामध्ये पोहोचली आहे.महाराष्ट्रात राहुल गांधी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राहुल गांधी हे सर्वसामान्य कार्यकर्ता सोबत संवाद साधत आहेत. तर देशातील शेतकरी शेतमजूर व विविध क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या समस्यांचा निपटारा करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील असा आत्मविश्वास राहुल गांधी पदयात्रेत कार्यकर्त्यांना देत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.त्यांच्या पदयात्रेला विविध क्षेत्रातून नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून उत्साहास जिल्हाभरामधून नागरिक गावोगावी पदयात्रेत सहभागी होत असून खासदार राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत आहेत. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी समृद्ध भारत देशाची संकल्पना मांडली होती माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे 21 शतका मध्ये भरीव प्रगतीचे त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासदार राहुल गांधी हे देशभर पायी पदयात्रेतून दौरा करीत असून विविध वेशभूषा ,विविध भाषा व प्रांतातून देशभराचा ते दौरा करीत असल्याने त्यांच्या पदयात्रेचे सर्वत्र कौतुक होत आहे .काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी भारत जोडो पदयात्रेमध्ये लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना उत्कृष्ट नियोजन करून सहभागी करण्यामध्ये मोलाचे कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याचे ही काँग्रेस पक्षातून कौतुक होत आहे.भारत छोडो पदयात्रेने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली असून पक्षाला बळकटी येणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
إرسال تعليق