लातूर ग्रंथोत्सव मध्ये जी.के.जोशी वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग

लातूर ग्रंथोत्सव मध्ये जी.के.जोशी वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग 















लातूर प्रतिनिधी -उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, लातूर आयोजित लातूर ग्रंथोत्सव 2022 कवी संमेलनामध्ये जी.के.जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालयातील अस्लम शेख, प्रगती जोशी व पायल मळगे या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. लातूर जिल्ह्यातील मान्यवर कवींची शाबासकीची थाप त्यांना मिळाली. याप्रंसगी मान्यवर कवी-कवयित्री यांची उपस्थिती होती. प्रा. नयन भादुले-राजमाने,राजेसाहेब कदम, डॉ. क्रांती मोरे,प्रा.गोविंद जाधव, वृषाली पाटील,रामदास कांबळे,उषा भोसले,प्रा.मारूती कसाब, विजया भणगे,उमा व्यास, सुनीता मोरे, सुलक्षणा सरवदे, सुनीता कुलकर्णी,डॉ.हाशिम पटेल, विभा बोकिल,सुलोचना मुळे, इ.कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी प्रसिध्द कवयित्री शैलजा कारंडे होत्या.सूत्रसंलन अनिता यलमटे यांनी केले. तसेच असंख्य रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुजाता चव्हाण, डॉ. प्रा. सचिन प्रयाग, डॉ. प्रा. विद्यादेवी कांबळे, प्रा. कल्पना झांबरे, प्रा. निलेश क्षिरसागर इ. अभिनंदन केले. सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم