प्रा. रविन्द्र कारंजे सेवानिवृत्त

प्रा. रविन्द्र कारंजे सेवानिवृत्त 






औसा: येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयात कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रा. रविन्द्र विजयकुमार कारंजे हे आपल्या 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ऑक्टोबर 2022 अखेर सेवानिवृत्त झाले. महाविद्यालयात आयोजित सेवापूर्ती गौरव समारंभात श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव गिरीश पाटील, उपाध्यक्ष बाबूअप्पा उटगे, उपाध्यक्ष बस्वराजप्पा वळसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
        प्रा. रविन्द्र कारंजे यांनी अत्यंत समर्पित भावनेने आपली सेवा बजावली असून महाविद्यालयासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नसल्याचे मत सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव सुभाषप्पा मुक्ता, कोषाध्यक्ष भानुदास डोके, विश्वस्त माजी प्राचार्य सूर्यभान जाधव, रविन्द्रनाथ महाराज औसेकर, अरविंद कुलकर्णी, मोहम्मद हनीफ आलुरे, राजशेखर बिराजदार, प्राचार्य डॉ. महेश्वर बेटकर, उपप्राचार्य डॉ. सुभाष मिसाळ, प्रा. रविन्द्र कारंजे यांचे वडील विजयकुमार कारंजे, आई सौ. स्नेहलता कारंजे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
    याप्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव गिरीश पाटील यांनी प्रा.  रविन्द्र कारंजे यांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना त्यांच्यातील शिस्तप्रियता, विषय शिकवण्याची तळमळ, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा, निसर्गप्रेम, दातृत्व, उपक्रमशीलता या गुणांचा गौरव केला. ग्रंथपाल प्रा. अंबादास खिलारे, माजी प्रा. अशोक खानापुरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर गरड यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेशप्पा कारंजे, रघुनाथ तापडिया, श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, भगीरथ जाधव, सुनीलप्पा उटगे, माजी उपप्राचार्य गुरुलिंगप्पा औटी, डॉ. संजय काळे, डॉ. कर्मवीर कदम, डॉ. प्रकाश कराड, अशोक नांगरे, माजी ग्रंथपाल प्रा. विजयकुमार मिश्रा, प्रा. मदन मुळजे, प्रा. चंद्रकांत पाटील प्रा. प्रवीण उटगे यांच्यासह सर्व आजी-माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रा. रविन्द्र कारंजे यांचे नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم