पी एम स्वनिधी योजनेसाठी शहरातील पथविक्रेते यांनी योजनेचा लाभ घ्यावा – आयुक्त मनोहरे
लातूर-शहर महानगरपालिका, लातूर PMSVANidhi योजना अंतर्गत टाळेबंदी ( Lockdown ) कालावधीत शहरातील व्यवसाय मोडकळीस आलेल्या पथविक्रेत्याना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवलाचा पत पुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ( PMSVANidhi ) योजना शहरातील पथविक्रेत्यासाठी सदर योजनेची अमलबजावणी करण्यात येत आहे. शहरी पथ विक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह रु. 10000/- चे खेळते भांडवली कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील.
व्याज दर बँकेच्या प्रचलित व्याजदरप्रमाणे तसेच RBI च्या मार्गदर्शक सूचनानुसार लागू राहील. नियमित कर्ज परतफेड करणार्यां चे व्याज अनुदानाची रक्कम कर्जदाराच्या खात्यात तिमाहीप्रमाणे शासनाकडून जमा केली जाईल. आतापर्यंत शहरातील 3213 लाभार्थ्यांना प्रती 10000/- प्रमाणे 3 कोटी 21 लाख रु कर्ज मंजूर झालेले असून त्यापैकी 2948 लाभार्थ्यांना प्रती 10000/- प्रमाणे 2 कोटी 94 लाख रु कर्ज वाटप झालेले आहे तसेच 226 लाभार्थ्यांना प्रती 20000/- प्रमाणे 45 लाख रु कर्ज वाटप झालेले आहे.
तरी शहरातील जे पात्र पथविक्रेते या योजनेपासून वंचित राहिले असतील त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व ही त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे 15 नोव्हेंबर 2022 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी व अधिक माहितीसाठी मनपा रूम नंबर 11 मध्ये संपर्क करावा, असे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.
إرسال تعليق