कॉक्सिटमध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी


कॉक्सिटमध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी



 लातूर-   येथील कॉक्सिट महाविद्यालयातमाजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
  यावेळी कॉक्सिटची बी. एस्सी तृतीय वर्षातील विद्यार्थिनी श्‍वेता राजेंद्र बिराजदार हिने लहुजी साळवे यांच्या तर बीव्होक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रथम वर्षातील विद्यार्थी शुभम भोसले याच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, डॉ. डी. एच. महामुनी, डॉ. व्ही. व्ही. भोसले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. गणेश पवार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم