लातूर जिल्हा बँक व साखर कारखानाच्या वतीने ऊसतोडणी यंत्र कलश पूजनाचा सोहळा

लातूर जिल्हा बँक व  साखर कारखानाच्या वतीने ऊसतोडणी यंत्र कलश पूजनाचा सोहळा

लातूर -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील ८  साखर कारखान्याच्या ९१ उस उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल १०५ कोटी ७२ लाख रुपये कर्ज देण्यात आले असून यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेने हरवेस्टर साठी कर्ज दिल्याने युवक, शेतकरी सभासदांना  रोजगार निर्मितीकडे वाटचाल   देण्याचा प्रयत्न जिल्हा बँकेकडून  होत असून हा आगळा वेगळा सोहळा लातूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल येथे जिल्हा बँक व जिल्ह्यातील मांजरा साखर कारखाना, रेणा, जागृति, विलास साखर युनिट १ व २, ट्वेंटी वन शुगर, सिध्दी शुगर, मारुती महाराज न्यू हॉलंड, शक्तिमान, करतार हारवेस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ऊसतोडणी यंत्राचे कलश पूजन सोहळा  राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून   राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, यांची उपस्थिती राहणार आहे

या भव्य दिव्य उस तोडणी कलश पूजन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव, संचालक अँड श्रीपतराव काकडे संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक व्यंकटराव बिरादार, एन. आर. पाटील, अशोक गोविंदपूरकर, दिलिप पाटील नागराळकर, राजकुमार पाटील, मारोती पांडे, भगवानराव पाटील तळेगावकर, जयेश माने, अनुप शेळके, सौ स्वयंप्रभा पाटील, सौ अनिता केंद्रे, श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, सौ सपना किसवे, स्विकृत संचालक सुनिल कोचेटा, कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले आहे

हार्वेस्टरसाठी १०५ कोटी रुपये कर्ज देणारी  लातूर जिल्हा बँक देशात पहिली

जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढल्याने तसेच उस तोड  कामगार ची कमतरता व निकड लक्षात घेऊन जिल्हा बँकेने १०० कोटी रुपये कर्ज हार्वे स्टर साठी  देणार असल्याचे बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी घोषणा केली होती त्याच्या पुढें जावून आज १०५ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे नेते जे बोलतात ते नेहमीच करून दाखवतात राज्यात नव्हे तर देशात पहिली जिल्हा बँक आहे शेतकरी सभासदांना हरवे स्टर साठी १०५ कोटी रुपये  कर्ज देणारी ठरलेली आहे.

Post a Comment

أحدث أقدم