लातूर फार्मसीत संस्थाचालक व प्राचार्य गटातील नवविवार्चित सिनेट सदस्यांचे सत्कार

लातूर  फार्मसीत संस्थाचालक व प्राचार्य गटातील नवविवार्चित सिनेट सदस्यांचे सत्कार














 औसा (प्रतिनिधी ) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थाचालक व प्राचार्य गटातील नवविवार्चित सिनेट सदस्यांचे सत्कार समारोह सोहळा कार्यक्रम लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात पार पडला . या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य , डॉ. रमाकांतजी घाडगे ,  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे होते , या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती माता  आणि स्वामी रामानंद तीर्थ  यांच्या प्रथेमेचे पूजन करून करण्यात आले . जे काही शैक्षणिक धोरणानुसार प्राध्यापक व विध्यार्थ्यांच्या अडचनी असतील ते सोडविण्याचा प्रयत्न केले जाईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ पवार कुसुम यांनी केले.            त्याच बरोबर संस्थाचालक व्यवस्थापन गटातील   प्राचार्य  डॉ पवार कुसुम,डॉ  जोशी धनराज गोविंदजी यांचा सत्कार संस्था अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे यांनी केले  तर प्राचार्य गटातील  डॉ बच्चेवाड दीपक द्वारकादास ,   प्राचार्य डॉ  भोसले वसंत केशवराव ,   प्राचार्य डॉ गव्हाणे महादेव हरिदास . ,  प्राचार्य डॉ कांबळे बालाजी , प्राचार्य डॉ वाघमारे संजय ,यांचा सत्कार  कोषाध्यक्ष  शिवलिंग जेवळे  यांनी केले .                        विद्यापीठातील शैक्षणिक परिषद समोरील नवीन शैक्षणिक धोरन अंमलबजावणी करताना येणारी वेगवेगळी आव्हाने पेलावी लागणार आहे मग त्यात नवीन अभ्यासक्रम तयार करणे असो किंवा नवीन कोणतेही धोरणे असतील तसेच महाविद्यालय , प्राध्यापक व विध्यार्थ्यांचे प्रश्न  असतील ते सोडविण्याचा प्रयत्न केले जाईल असे प्राचार्य  डॉ  भोसले वसंत केशवराव तसेच  डॉ. रमाकांतजी घाडगे यांनीसंस्थाचालक व प्राचार्य गटातील नवविवार्चित सिनेट सदस्यांचे सत्कार केला त्याबद्दल श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे आभार  व्यक्त केले .    प्राचार्य डॉ श्यामलीला बावगे  (जेवळे), प्राचार्य भूमरेला श्रीनिवास , संचालक नंदकिशोर बावगे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.  या कार्यक्रमात प्रास्ताविक पर भाषण कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी केले.  तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . राजेश विभूते यांनी केले व  आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ श्यामलीला बावगे (जेवळे)यांनी केले .

Post a Comment

أحدث أقدم