शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये इंदिरा गांधी जयंती साजरी


शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये इंदिरा गांधी जयंती साजरी




 लातूर- येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या हस्ते गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी यांनी केले. यावेळी एकनाथ जाधव, सूरज गड्डिमे, ओम लवटे, मानसी पाटील, अनघा पाटील, माधुरी पाटील, दर्शना देशमुख, अश्विनी पवार, शीतल नडगिरे, वर्षा कांबळे, रेणुका समुद्रे, ऐश्वर्या बागल, प्रांजली पाटील, सुषमा मुंडे, उषा गुडदे, गीतांजली गिरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم