अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन




लातूर -31 ऑक्टोबर ते दिनांक 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये राबविण्यात येत असलेल्या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तिकरण या कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नारी प्रबोधन मंच,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड येथील ग्रामपंचायत येथे करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुमतीताई जगताप, प्रमुख वक्त्या अॅड. सुमेधा शिंदे,उपसरपंच अशोक कणसे, संस्थेच्या सहसचिव प्रा. नयन राजमाने, संस्थेच्या सदस्य शोभा वारद मॅडम यांची मंचावर उपस्थिती होती. 
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सहसचिव  प्रा.नयन राजमाने यांनी केले.प्रमुख वक्ता अॅड.सुमेधा शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची सविस्तर माहिती दिली. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यास सांगून समस्येचे निराकरण केले. उपसरपंच मा. अशोक कणसे यांनी दोन्ही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले तसेच पुन्हा कार्यक्रमासाठी येण्याची विनंती केली. मा. सुमती जगताप यांनी अध्यक्षीय समारोप केला.कार्यकर्ता विकास पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तसेच संस्था सदस्य शोभा वारद यांनी आभार व्यक्त केले.याप्रसंगी  नागरिकांना माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला रोहिले सर व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم