ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवा;विकास निधी कमी पडू देणार नाही- आ. कराड

ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवा;विकास निधी कमी पडू देणार नाही- आ. कराड




 लातूर :- येत्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सक्षम पॅनल उभा करून भाजपाचा सरपंच निवडून आणावा त्याचबरोबर ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवावाराज्यात आपले सरकार असल्याने भाजपाच्या ग्रामपंचायतींना विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.

         लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ७० गावासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. सदरील निधी मिळाल्‍याने रेणापूर तालुक्यातील अनेक गावच्‍या भाजपा कार्यकर्त्‍यांनी आ. कराड यांचा सत्‍कार करून त्यांचे आभार व्‍यक्‍त केले.

           राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयामार्फत गावांतर्गत मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत रेणापूर तालुक्यातील ३१ गावासाठी २ कोटी २१ लाख १८  हजार रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. निधी मिळालेल्या गावातील भाजपा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी सोमवारी सकाळी संवाद कार्यालयात आ. रमेशअप्पा कराड यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपाचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसेतालुकाध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदेजिल्हा उपाध्यक्ष वसंत करमुडे, सतिश आंबेकर, गोविंद नरहरे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकर, भाजपाचे अ‍ॅड. मनोज कराड, श्रीकृष्ण पवार आणि कुलदीप सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

          यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले कीरेणापूर तालुक्यातील अनेक गावागावात आणि वाडी तांड्यात शासनाच्या विविध योजनेसह आमदार फंडखासदार फंड या माध्यमातून विकास कामासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. राज्यात आपले शिंदे - फडणीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्याने ग्रामीण भागातील विकासाला मोठ्या प्रमाणात विकास निधी देण्यात येत आहे. तेंव्हा ज्या-ज्या गावात येत्या काळात ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्या गावच्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिद्दीने, जोमाने कामाला लागून ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली पाहिजे, भाजपाचाच सरपंच झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत असे बोलून दाखविले.

          गावांतर्गत मूलभूत विकास योजनेचा निधी आल्याने ज्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे तेथील कार्यकर्त्याना मोठी ऊर्जा मिळाली त्यांच्यात चैतन्य निर्माण झाले असल्याचे यावेळी तालुका अध्यक्ष अँड. दशरथ सरवदे यांनी सांगून आ. रमेशअप्पा कराड यांनी मतदारसंघातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला. ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलून दाखविले. तर आरजखेडा येथील कुलदीप सूर्यवंशी यांनी आ. रमेशअप्पा कराड यांच्यामुळेच कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ मिळाले असल्याचे सांगून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांच्या वतीने आभार व्यक्त केले.

         याप्रसंगी राजू हाके पाटील, विजयकुमार भिसे, प्रवीण शिंदे, भैय्या गाडे, मोईन शेख, महेश शिंदे, हाजी शेख, नवनाथ रांजणे, समीर पठाण, अफसर शेख, रामकिशन दहिरे, मुन्ना अहमद शेख, राजेश करकसे, प्रकाश रेड्डी, लक्ष्मण काळे, सायस धावारे, बालासाहेब सूर्यवंशी, जलील शेख, सूर्यकांत किटेकर, सुरेश कटके, शिवाजी काळे, अंकुश लोणकर, बालासाहेब बरीदे, बाषुमिया शेख, विठ्ठल कस्पटे, शिवमूर्ती उरगुंडे, सुरेश गिरी, रसूल शेख, महादेव घुले, पाटील केंद्रे, गोविंद केंद्रे, अच्युत मुंडे, संजय केंद्रे, सुनील सूर्यवंशी, राजाभाऊ सूर्यवंशी, वजीर पठाण, बालाजी फड, नरसिंग चपटे, अविनाश बोराडे, विश्वनाथ करपे, वैभव जाधव, गणेश चिमणकर, श्रीकांत हाके, किशन क्षिरसागर, अजित पाटील, विलास चेवले, दत्ता चेवले, धनंजय ठोंबरे, राम ठोंबरे, ओमकार क्षिरसागर, शंकर मानेहनुमंत जाधव, भीमा माने, चंद्रकांत पाटील, बळी जाधव, संजय जाधव, रामसिंग चव्हाण यांच्यासह विविध गावच्या अनेकांनी आ. रमेशअप्पा कराड यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم