महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी वतीने एड्स दिनानिमित्त रॅली संपन्न
निलंगा प्रतिनिधी-शहरातील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा व उपजिल्हा रुग्णालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त निलंगा शहरामध्ये रॅली काढून जनजागरण करण्यात आले .
या रॅलीला प्राचार्य डॉ. भागवत पौळ व प्राचार्य डॉ. सिध्देश्वर पाटील सर व डॉ बसुदे मॅडम उपजिल्हा रुग्णालय यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात केली.
ही रॅली यशस्वी करण्यासाठी प्रा. गरड सर, प्रा हानपुडे सर, प्रा. डॉ. ठाकरे सर,प्रा.परवेज शेख व प्रा.सुजित पवार सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यायातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी रॅली मध्ये सहभागी झाले.
यावेळी डॉ. बसुदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना एड्स संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
إرسال تعليق