शाश्वत विकासासाठी सरपंचांचे उजळणी प्रशिक्षण

 शाश्वत विकासासाठी सरपंचांचे उजळणी प्रशिक्षण




लातूर:-राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२२-२३अंतर्गत ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन व यशदा पुणे यांच्या वतीने आयोजित लातूर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे सरपंचाचे उजळणी प्रशिक्षण संपन्न. दिनांक ८ते१०डिसेंबर २०२२ या काळात जिल्ह्यातील तेवीस सरपंचांचे तीन दिवशीय निवासी प्रशिक्षण घेण्यात आले.
 त्यात शाश्वत विकासासाठी नऊ ध्येये सांगण्यात आली.
यांनी सखोल मार्गदर्शन केले.दुपार सत्रात आधुनिक व कृषी पुरक उपक्रमांची पाहणी क्षेत्र भेट घेण्यात आली.कृषी विज्ञान केन्द्र लातुर यांनी या कामी मदत व मार्गदर्शन केले.उद्घाटन कार्यक्रमांचे प्रास्ताविक नीता मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन यशदा पुणे चे प्रविण प्रशिक्षक कमलाकर सावंत यांनी केले.सत्र संचालक म्हणून प्रभाकर बिराजदार यांनी काम पाहिले.तर प्रशिक्षक म्हणून पंकज शेळके,माधव गंभीरे,ए. ए.सय्यद आदिंनी मार्गदर्शन केले.सदरील प्रशिक्षण सर्वोत्तम झाल्याचे गोपिचंद पवार सरपंच वाघोली व नाईक यांनी समारोपात मांडले.

Post a Comment

أحدث أقدم