पुणे-लातूर-अमरावती रेल्वे पुन्हा धावणार -खासदार सुधाकर शृंगारे

पुणे-लातूर-अमरावती रेल्वे पुन्हा धावणार -खासदार सुधाकर शृंगारे  
                                               

 ( लातूर -प्रतिनिधी ) साधरणतः दोन वर्षापूर्वी बंद करण्यात आलेली पुणे-लातूर-अमरावती हि रेल्वे गाडी  आता आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे . विशेष म्हणजे लातूरकरांच्या सोयीसाठी या गाडीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे . लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरुवात करण्यात यावी अशी लातूरकरांची  अनेक दिवसांची मागणी आहे , हि मागणी लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे  यांनी रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा केला होता , या पाठपुराव्याला आता यश येत  आहे . लोकांनी जास्तीत जास्त या  रेल्वेचा प्रवासासाठी उपयोग करावा असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे  यांनी केले आहे . प्रवासी संख्या वाढल्यास आठवड्यातून दोनदा असलेल्या फेऱ्या आणखी वाढवल्या जाणार आहेत .  
                            --- याबाबत  मध्यरेल्वे सल्लागार समितीचे सदस्य  शामसुंदर मानधना  यांनी दिलेली माहिती अशी कि ,  १६ डिसेंबर पासून पुणे-लातूर-अमरावती हि रेल्वेगाडी सुरुवात करण्यात येणार आहे . झिरो बेस्ट टाइमटेबलने देशातल्या अनेक गाड्या कोविड  काळात बंद करण्यात आल्या होत्या , त्यामध्ये या गाडीचाही समावेश होता . मात्र खासदार सुधाकर शृंगारे  यांच्या प्रयत्नांनी हि गाडी पुन्हा सुरुवात करण्यात येत आहे . आठवड्यातल्या  शुक्रवार आणि रविवारी हि गाडी पुणे स्टेशनवरून लातूर ,अमरावतीकडे  मार्गस्थ होईल तर परतीच्या  प्रवासात रविवारी आणि मंगळवारी अमरावती येथून लातूर मार्गे पुणेकडे जाईल . पुणे स्टेशनवरून हि गाडी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी सुटेल ,लातूर स्टेशनवर  पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल. परतीच्या  प्रवासात हि गाडी अमरावतीवरून रात्री ७.५०  ला निघून लातूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३५ ला पोहचेल. तर पुणे शहरात दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पोहचेल .  या गाडीचे अगोदरचे वेळापत्रक लातूरकरांच्या फारसे उपयोगाचे नव्हते  . मध्यरात्री २. ३० ला हि गाडी लातूर स्टेशनवर येत होती त्यामुळे या गाडीला प्रवासी  प्राधान्य देत नव्हते . आता मात्र लातूरवरून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून लातूरला येणाऱ्या प्रवाश्यांच्या सोयीचे वेळापत्रक देण्यात  आले आहे . हडपसर पासून हि रेल्वे चालविण्यात यावी अशी मागणी होत होती मात्र खासदार सुधाकर शृंगारे  यांनी आग्रह धरून हि गाडी पुणे स्टेशनवरून सुरुवात केली आहे . या गाडीला उरळीकांचन हा थांबा ठेवण्यात आलेला आहे . पुणे ,कुर्डुवाडी,उस्मानाबाद ,लातूर मार्गे लातूररोड  परळी,परभणी ,पूर्णा , हिंगोली ,अकोला,अमरावती असा या गाडीचा मार्ग असणार आहे . या गाडीचा क्रमांक ०१४३९ असणार आहे तर परतीच्या  प्रवासात गाडी क्रमांक ०१४४० असणार आहे . पुणे-लातूर-अमरावती हि गाडी नियमित करण्याचा खासदार सुधाकर शृंगारे  यांचा प्रयत्न आहे , लातूरकरांनी या गाडीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे . हि गाडी सुरुवात केल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ,  केंद्रीय  राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे प्रशासनाचे खासदार सुधाकर शृंगारे  यांनी आभार मानले आहेत . सोलापूर-लातूर-तिरुपती ,सोलापूर-लातूर-कुर्ला या दोन गाड्यां सुरुवात केल्या नंतर खासदार सुधाकर  शृंगारे  यांनी पुणे-लातूर-अमरावती हि गाडी सुरुवात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत . या आठवड्यात तीन नवीन रेल्वेगाड्या लातूर स्टेशनवरून सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे . 

Post a Comment

أحدث أقدم