माणुसकीचे दर्शन घडवणारे लेखन-डॉ.श्रुती श्री वडगबाळकर

माणुसकीचे दर्शन घडवणारे लेखन-डॉ.श्रुती श्री वडगबाळकर





            लातूर प्रतिनिधी - शब्दांकित साहित्य मंच, लातूर द्वारा आयोजीत 'पुस्तकावर बोलू काही' या कार्यक्रमा अंतर्गत प्रसिद्ध लेखिका छाया महाजन लिखित 'चंद्राचे तुकडे या ललीत लेख संग्रहावर ऑनलाइन कार्यक्रमाचे  आयोजन करण्यांत आले. प्रमुख वक्त्या होत्या प्रा. डॉ. श्रुतीश्री वडगबाळगर मॅडम, माजी मराठी विभाग प्रमुख, महिला बुर्ला महाविद्यालय,सोलापूर. तसेच या कार्यक्रमाचे अध्यस्थान डॉ. सतिश बडवे सर, माजी विभाग प्रमुख मराठी भाषा व वाड्ग्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. प्रसिध्द लेखिका छाया महाजन, शब्दांकित साहित्य मंच लातूरच्या संस्थापक अध्यक्ष प्रा. नयन भादुले - राजमाने,'साहित्यनयन',अॅड. रजनी गिरवलकर उपस्थित होत्या. 

                 प्रास्तविकात प्रा. नयन भादुले - राजमाने,'साहित्यनयन' यांनी संस्थेच्या उपक्रमांची सविस्तरपणे मांडणी केली. या कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन सदस्य, शब्दांकित साहित्य मंचच्या अँड. रजनी गिरवलकर यांनी केले.
                    'चंद्राचे तुकडे' या ललित लेख संग्रहावर वक्ता डॉ. श्रुती श्री वडगबाळकर म्हणाल्या या सर्व लेखातून डॉ. छाया महाजन यांचे व्यक्तिमत्व तर दिसतेच पण त्यांचे संस्कार विचार चिंतनही सहजपणे व्यक्त झाले आहे . भाषाशैली वाचकाला खेळवून ठेवणारी आहे. अगदी सहजपणे एखाद्याशी संवाद साधावा तसेच त्या वाचकाची संवाद साधतात त्यामुळे हे लेख वाचनीय झाले आहेत..
             मोहक शैलीतील ललित गद्य 'चंद्राचे तुकडे' माणसांचे वाचन करत माणसाच्या जगण्याची दखल घेतात, घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सतीश बडवे सर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अन्वय लावण्याची स्वतंत्र दृष्टी छाया महाजन यांच्या कडे आहे,त्या चिंतनशील लेखिका आहेत. लेखनातील लालित्य, चिंतनपरता आणि समाजसन्मुखता याचा त्रिवेणी संगम म्हणजे छाया महाजन यांचे लेखन आहे. इतकेच नव्हे तर 
बहुमिती स्वरूपाचे त्याचे लेखन आहे. त्यांचे
शब्द प्रभुत्व, चिंतन शैली वाखाणण्याजोगी आहे. विषयाचे वैविध्य आहे. त्या मानवाची आजची वर्तन प्रक्रिया यावर भाष्य करतात. हे लेखन म्हणजे निसर्ग चिंतन आहे. अशा प्रकारे डॉ. सतीश बडवे यांनी अध्यक्षीय समारोप करताना मत व्यक्त केले. 
                या कार्यक्रमास बहुसंख्येने रसिक श्रोते उपस्थित होते. उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत -श्रोत्यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे आभार प्रा. सौ. नयन राजमाने मॅडम यांनी मानले. याप्रसंगी डॉ. माया लक्का- बंगलोर, उमा कोल्हे- पुणे, आशा पाटील-पंढरपूर, सुरेश गीर 'सागर'- दुबई, डॉ. प्रभा वाडकर, संयुक्ता आरेकर, सर्वोत्तम बेलूरकर,शोभा लोकुर, आशा रोडगे, कमलाकर सावंत, व्यंकटेश कुलकर्णी, सुनेत्रा पंडित, सूर्यकांत घेवारी, उषा भोसले, विना धनेश्वर, विजया भणगे,  नीलिमा देशमुख, वृषाली पाटील, राजेंद्र राऊत, सुलक्षणा सोनवणे,सुनीता मोरे इ. अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم