प्रथम ही देशातील बेरोजगार मुक्तीची गंगोत्री : सौ. अनिता गांगुर्डे


प्रथम ही देशातील बेरोजगार  मुक्तीची गंगोत्री : सौ. अनिता गांगुर्डे
                                                                                                                                                             
लातूर : -
            देशात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली असून यावर मात करण्यासाठी प्रथम संस्था बेरोजगार मुक्तीची गंगोत्री आहे असे विचार प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या राज्यप्रमुख सौ अनिता गांगुर्डे यांनी व्यक्त केले.
                                                       लातूर येथील प्रथम संस्थेच्या हेल्थकेअर (नर्सिंग) शाखेचा पाल  या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम शहरातील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात रविवारी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.  यावेळी सौ. गांगुर्डे या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील प्रसिद्ध डॉक्टर्स डॉ. उदय देशपांडे, डॉ. सौ सुनीता देशपांडे, डॉ. अतुल उरगुंडे, डॉ. विनोद स्वामी, डॉ. सरोज उटगे, डॉ. धर्मराज दुडे, डॉ. श्रीकांत बाहेती व कोटक बँकेचे सह व्यवस्थापक श्री विकास कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
                                           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम संस्थेचे विभाग प्रमुख  सदाशिव साबळे हे होते, यावेळी सौ गांगुर्डे बोलताना पुढे म्हणाल्या प्रथम ही जागतिक पातळीवर काम करणारी संस्था असून गेल्या 27 वर्षापासून देशातील 23 राज्यांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत आहे. याबरोबरच बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन प्रथम च्या माध्यमातून मागील 17 वर्षापासून कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये हेल्थकेअर नर्सिंग, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिकल, वेल्डिंग, सोलार यासारख्या कोर्सेसचा समावेश आहे एक ते दोन महिन्याचे किल्लारी व लातूर येथे मोफत निवासी प्रशिक्षण देऊन राज्यातील नामांकित कंपनीत रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्याचे सतत प्रयत्न प्रथमच्या माध्यमातून केले जात आहेत. मराठवाड्यातील 18 ते 30 वयोगटातील बेरोजगार युवक युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या बरोबर आपल्या देशाची आर्थिक प्रगती करावी असे आव्हान त्यांनी यावेळी बोलताना. यावेळी डॉ. सुनिता देशपांडे यांनी वैद्यकीय पेशा व्यवसाय न समजता सेवा समजून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा केल्याचा आनंद मिळवावा असे म्हणाल्या.यावेळी सदाशिव साबळे, संतोष गुंजोटे, बालाजी भालेराव, तसेच हेल्थकेअर कोर्सच्या माजी विद्यार्थिनी कुमारी संध्या लांडगे, कुमारी ऐश्वर्या पुटे, कुमारी मनीषा कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात "तुम्हा मानाचा मुजरा" या स्वागत गीतांनी करण्यात आली यावेळी केंद्रातील विद्यार्थिनींनी कोविडसह विविध गाण्यावर बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी गायकवाड यांनी केले. प्रास्तविक  सौ खुरबानू शेख, यांनी तर आभार प्रदर्शन संतोष गुंजोटे यांनी   केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ सोनी रणदिवे, अश्विनी कांबळे, ईश्वर कांबळे, मेंटर लक्ष्मण मंडले, अमर कांबळे, अरविंद पवार, प्रशांत बारसे , राम कोथिंबीरे यांनी परिश्रम घेतले.  या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक महिला विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

أحدث أقدم