बाजार समिती निवडणुकीत नवीन सरपंच व सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा- मनोज सोमवंशी

बाजार समिती निवडणुकीत नवीन सरपंच व सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा-   मनोज सोमवंशी





 औसा प्रतिनिधी -तालुक्यातील हिप्परसोगा गावचे नूतन सरपंच मनोज माधवराव सोमवंशी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नवीन ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी केली आहे.
औस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्या दिवशी औसा तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त होते. तरी सरपंच व सदस्य रिक्त असताना सुद्धा मतदार यादी तयार करण्यात आली आहे. दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी 60 नवीन ग्रामपंचायतीवर सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. आज रोजी जुनी ग्रामपंचायत सदस्य पदावर नाहीत. सदरच्या मतदार यादीत नामनिर्देशक पत्राच्या अंतिम दिनांक पर्यंत अथवा मतदानापर्यंत बदल करण्याचा अधिकार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांना असल्याकारणाने सदरच्या यादीत बदल करून नवीन सरपंच व सदस्य समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी हिप्परसोगा गावचे नूतन सरपंच मनोज माधवराव सोमवंशी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांना केलीआहे.

Post a Comment

أحدث أقدم