कराटे स्पर्धेत ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुलचे यश


कराटे स्पर्धेत ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुलचे यश


औसा- (प्रतिनिधी):लातूर जिल्हा क्रिडा विभागाच्या वतीने जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा क्रिडा संकुल, लातूर येथे  दि. 2 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाल्या. सदरील स्पर्धेमध्ये आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुल मधील सहभागी विद्यार्थी सुरवसे ऋषीकेश सिध्देश्वर (वयोगट 17 वर्षे)या विद्याथ्र्यांने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक  कावाले अनिकेत गोरोबा (वयोगट 17 वर्षे) व सुरवसे ऋतुजा सिध्देश्वर (वयोगट 17 वर्षे) यांनी प्राप्त केला.अतिशय चुरसीच्या व अटीतटीच्या रोमांचक कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्याथ्र्याची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झालेली आहे.सदरील यस्वस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक शेख मंजुरपाशा यांचा सत्कार संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, विश्वेश्वरय्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गोपाळ दंडिमे, स्कुलच्या प्राचार्य स्वाती कापसे, सहाय्यक शिक्षक शेख सोहेल, पांडुळे विनोद, वडे सौरभ, पोतदार दिपा, जाधव सुप्रिया, खोजे दिपक व शरद साळुंके उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, शाळेच्या प्राचार्या स्वाती कापसे, सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्याथ्र्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم