शहीद नायक सुरेश चित्ते स्मृतीदिनामित्त आलमला येथे 52 जणांचे रक्तदान

शहीद नायक सुरेश चित्ते स्मृतीदिनामित्त आलमला येथे 52 जणांचे रक्तदान
आलमला : औसा तालुक्यातील आलमला गावचा सुपुत्र शहीद नायक सुरेशभैय्या गोरख चित्ते यांच्या स्मृतीदिनामित्त  आलमला येथील शिवलिंगेश्वर मंदिरात रविवारी (दि.२२) सकाळी १० वा. झालेल्या रक्तदान शिबिरात 52 जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन राज्य बाजार समिती महासंघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव बसवेश्वर  धाराशिवे, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, दिशा प्रतिष्ठानचे सोनू डगवाले, पत्रकार शशिकांत पाटील, सरपंच  कैलास निलंगेकर, महादेव कुंभार, शतकवीर रक्तदाते भीमराव बिराजदार पाटील, धानोराचे सरपंच मुसणे, अॕड. सचिन हुरदळे, अरविंद कोळपे, भालचंद्र ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी किशोर पवार व त्यांचे सहकारी, संयोजक कपिल धाराशिवे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शतकवीर रक्तदाते भीमराव बिराजदार पाटील यांचा संयोजकांच्यावतीने संतोषभाऊ सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरपंच कैलास निलंगेकर यांनी केले तर आभार महादेव कुंभार यांनी मानले.
विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, तावरजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, आलमला ग्रामपंचायत व माऊली युवामंच यांच्या संयुक्त विद्यमाने व लातूरच्या भालचंद्र ब्लड बँकेच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात 52 जणांनी रक्तदान केले. उद्घाटनप्रसंगी सूत्रसंचलन संभाजी गुरव यांनी केले. यावेळी सर्व संबंधित संघटना व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरासाठी सर्व तरुण मंडळ व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم