लातूर एमआयटीत उत्साहात प्रजासत्‍ताक दिन आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण

 लातूर एमआयटीत उत्साहात प्रजासत्‍ताक दिन

आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण



           लातूर- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माईर्स एमआयटी वैद्यकीय शैक्षणिक संकुललातूर येथे गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.२० वाजता लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक तथा विधानपरिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी पुरस्कार वितरणासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

            प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस  आ. रमेशअप्पा कराड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वैद्यकीय शिक्षण प्रथम वर्षाच्या परीक्षेत महाविद्यालयातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास माणिक शेप यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा जनाबाई ग्यानबा शेप हा पुरस्कार नामदेव राख यास आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर लातूर एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अपर्णा अस्थाडॉ अभिजीत रायतेडॉ. रवी ईरपतगिरेडॉ. बस्वराज वारदआणि डॉ. सचिन इंगळे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना वेगवेगळ्या संस्थांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले होते. या सर्व उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठाच्या खो खो संघाच्या कर्णधारपदी एमआयटी लातूर फिजिओथेरपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा गांगुडे हिची निवड झाल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

        याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. जमादारउपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबाशैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळेप्रशासकीय संचालिक डॉ. सरिता मंत्रीफिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी जाधवनर्सींग महाविद्यालयाचे प्राचार्य सरवननदंत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. यतीश जोशीमुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडेरुग्णालय अधीक्षक डॉ. चंद्रकला पाटीलरुग्णालय प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडेडॉ. अरुणकुमार रावडॉ. विद्या कांदेडॉ. मुकुंद भिसेडॉ. एस एस कुलकर्णीडॉ. आशा पिचारेडॉ. फिरोज पठाणडॉ. एन व्ही कुलकर्णीडॉ. गजानन गोंधळीडॉ. शैला बांगडडॉ. मालूडॉ. कारंडेश्री. मधुकर गुट्टे यांच्यासह एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयएमआयडीएसआर दंत महाविद्यालयफिजीओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विभाग प्रमुखप्राध्यापकडॉक्टरविद्यार्थीपालक व नागरीक ध्वजारोहन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم