औसा बाजार समितीतील जनावरांचा बाजार गुरुवारपासून सुरु.

  औसा बाजार समितीतील जनावरांचा बाजार गुरुवारपासून सुरु.

औसा-
       लातूर जिल्हयातील जनावरामध्ये लंपी स्किन डिसीज हा साथ रोग जनावरांमध्ये आढळुन आल्याने व जलद गतीने पसरणारा अनुसुचित रोग अल्याने गेली पाच महीन्यापासुन जिल्हयातील पशु बाजार बंद करण्यात आलेले होते.
           पशु बाजार बंद असल्यामुळे शेतक-यांना शेती विषयक व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,लातूर यांनी लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण केले बाबतचे प्रमाणपत्र सोबत बाळगण्याच्या अटीच्या अधिन राहून लातूर जिल्हयातील सर्व बाजार सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे.
          त्या अनुषंघाने औसा बाजार समितीचा जनावरांचा बाजार उदया दिनांक 19/01/2023 पासुन सुरु करण्यात येत आहे तरी सर्व पशुपालन करणारे शेतकरी, व्यापारी यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या अटीस अधिन राहून लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण केले बाबत प्रमाणपत्र सोबत बाळगावे असे आवाहान बाजार समितीचे प्रशासक श्री. अशोक कदम व सचिव संतोष हुच्चे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم