शारदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

 शारदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा



 

 लातूर - येथील शारदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 शालेय प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. अजित जगताप यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.  यावेळी डॉ. जगताप यांनी प्रजासत्ताकदिनाचे महत्व विशद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रॉयल एजुकेशन सोसायटीचे सदस्य अण्णासाहेब यादव, नागोराव पाटील, शालेय प्रशासक एल. एम. पाटील, शाळेचे प्राचार्य डॉ. अभिषेक शर्मा, समन्वयक विलास गायकवाड, शीला शेळके, वैशाली गिरवलकर, विद्या पाल उपस्थित होते.
शिक्षणाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम दोन टप्प्यात घेण्यात आला. सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात येऊन राष्ट्रगीताचे सामुदायिक गायन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शारीरिक कवायतींची प्रात्यक्षिके सादर केली. दुसर्‍या टप्प्यात सकाळी १०:३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते.
विद्यार्थ्यांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीतावर विविध राज्यांच्या वेशभूषेत नृत्य सादर करून विविधतेतून एकतेचा असा संदेश दिला. नृत्यासाठी शिक्षिका मेघा जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. जोया देशमुख व वैष्णवी शितोळे या विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक म्हणजे काय, व त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा उलगडा केला. श्रेया केंद्रे या विद्यार्थिनीने राष्ट्रभक्तीपर गीतांच्या लयात योगासनाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
अध्यक्षीय प्राचार्य डॉ. अभिषेक शर्मा यांनी क्रांतिकारकांचे व स्वातंत्र्योत्तर भारतातील राष्ट्र सेवकांच्या त्याग व समर्पणाचे दाखले देऊन राष्ट्रसेवा परमो धर्म: या उक्तीला साजेसे कार्य करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती झुंजारे व आभार प्रदर्शन समरीन शेख यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم