विद्यार्थ्यांनी बेस्ट फॉर्मसिस्ट बनावे तुमच्या नावाबरोबर संस्थेचे व आई -वडिलांचे नाव मोठे होते. - माधव महाराज शिवनीकर

 विद्यार्थ्यांनी बेस्ट फॉर्मसिस्ट बनावे तुमच्या नावाबरोबर संस्थेचे व आई -वडिलांचे नाव मोठे होते. - माधव महाराज शिवनीकर


   श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वर्षांमधील डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले.
    या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूरचे श्री माधव महाराज शिवनीकर यांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व क्लासरूमचे फीत कापून उद्घाटन  केले. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर आप्पा बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,सचिव वेताळेश्वर बावगे, संचालक नंदकिशोर बावगे प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला उपस्थित होते. महाराजांनी मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की "विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील राहायला पाहिजे, बेस्ट फार्मासिस्ट बनावे तुमच्या नावाबरोबरच संस्थेचे व आई-वडिलांचे नाव मोठे होते" व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर संस्थेचे सचिव यांनी मनोगत व्यक्त करताना " महाविद्यालय व संस्था कुठेही कमी पडणार नाही ,दर्जेदार शिक्षण  महाविद्यालय तुम्हाला देण्यास सतत प्रयत्नशील राहील" असे सांगितले. त्याचबरोबर शिवलिंग जेवळे सरांनी मनोगत व्यक्त करताना "आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यावे तुम्हाला महाविद्यालय अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्यास प्रयत्नशील आहे, डिजिटल क्लासरूम, यु ट्युबच्या माध्यमातून क्लास, प्रयोगशाळा, ग्रंथालय नवीन पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास महाविद्यालय  कार्यक्षम आहे ".
त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.श्रीनिवास बूमरेला यांनी केले तर आभार  नंदकिशोर बावगे यांनी मांडले व सूत्रसंचालन शिवानी कौलखेर यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم