मानसिक स्वास्थ्याला हवी प्राथमिकता !

 मानसिक स्वास्थ्याला हवी प्राथमिकता !

आरोग्य म्हणजे शारिरीकमानसिक व सामाजिकदृष्टया सदृढ असल्याची अवस्था असून केवळ आजार वा दिव्यांगत्व नसणे म्हणजे आरोग्य नव्हे. मानसिक आरोग्य मात्र समजायला कठीण आहे. जीवनात येणाऱ्या विविध अनुभवांना एका विशिष्ट ध्येयाने वा उद्देशाने प्रेरित होऊन सुयोग्य प्रतिसाद देणे हे मानसिक आरोग्य चांगले असल्याचे लक्षण आहे. थोडक्यात मानसिक आरोग्य म्हणजे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा व भावनिक कलांचा समतोल विकास होणे. ज्यामुळे व्यक्तीला इतरांसोबत सलोख्याचे जगणे शक्य होईल. मनातील आशाआकांक्षाभावना व आदर्शाचा समतोल राखून जीवनात येणाऱ्या सुख दुःखांना समर्थपणे तोंड देणाऱ्या क्षमतेलाही भावनिक आरोग्य म्हणता येईल.

मानसिक आरोग्य बिघडण्यास आपल्या जैविकसामाजिकमानसिकगरज पूर्ण न होणे हे प्रमुख कारण आहे. मानसिक आरोग्याचा अर्थ असा आहे कीव्यक्ती आपल्या आयुष्यातील मुलभूत गरजा पूर्ण करु शकते. त्यासाठी स्वतःच्या सामर्थ्याचा वापर करते. परंतू योग्य वेळी त्यावर नियंत्रण ही ठेवते. व्यक्तीचे विचारजाणीवाकार्य करण्याची पध्दत, इच्छा व महत्वाकांक्षा, प्रत्येक गोष्टीस धैर्याने तोंड देणेइतर व्यक्ती समाधानी व आनंदी राहतील, असा प्रयत्न करणे याचा अंतर्भाव मानसिक आरोग्यात केला जातो.

व्यक्ती शारीरिक स्वास्थ्य चांगल्या प्रकारे संतुलित करु शकतो, परंतु सध्याच्या धावपळीच्या युगात मानसिक स्वास्थ्य व्यवस्थितीत ठेवणे कठीण बनले आहे. आरोग्य संपन्नता याला आजच्या आधुनिक युगात अतिशय जास्त महत्त्व दिले जात आहे. आरोग्य संपन्न व्यक्ती म्हटल कीपटकन डोळ्यांसमोर पिळदार स्नायुचा उंचपुरा व्यक्ती उभा राहतो. आपण असे गृहीत धरतो कीआरोग्य हे फक्त शारीरिक असते आणि एखादा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आजारी पडला म्हणजे तो आजारी आहे. आपल्या आरोग्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या शारीरिक घटकाकडे आपण दुर्लक्ष करतो ते म्हणजे आपले मानसिक आरोग्य. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हे एकमेकांसोबत संबंधित आहे. परंतु व्यक्तिमत्वाचा पाया हा मानसिक स्वास्थ्यावरच अवलंबून आहे, हे आपण विसरतो.

मानसिक स्वास्थ्याबाबत जागृत राहण्याची गरज

चांगल्या व्यक्तिमत्वासाठी चांगल्या शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य सुध्दा चांगले असणे आवश्यक आहे. आपण शारीरिक स्वास्थ्याबद्दल जेवढी काळजी घेतो, तेवढी काळजी मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याबद्दल आपण जागृत नाही. अनेकदा आपण मानसिकरित्या असामान्य आहोत, हे मान्यच करीत नाहीत किंवा परिस्थितीनुरूप आपले वर्तन सुध्दा तसे ठेवत नाही. त्यामुळेच आपल्याला सामान्य व असामान्य वर्तन मनस्थिीती यातील फरक ओळखता येत नाही. आपले वर्तन आपण स्वतः कधीच निरीक्षण करीत नाही. पण इतर लोकांना आपल्या वर्तनाची जाणीव होते. छोट्याशा कारणाने रागावणेविचित्र वागणेअसंबंध बोलणेवर्तनातील इतरांच्या चुका काढणेस्वतःच्या चुकांवर पांघरुण घालणेबोलणे व हसणे बंद करणेसतत चिंता करणेदुसऱ्यांवर संशय घेणेउदासीनताअतार्किक विचार करणे, भिती वाटणे, इतरांबद्दल अयोग्य विचार करून स्वतःमध्ये असामान्यता निर्माण करणे ही त्यातील काही उदाहरणे आहेत.

सभोवतालच्या वातावरणात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम मानवाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे.त्यामुळे व्यक्तीच्या मनासिक तणावात वाढ झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. योग्यप्रकारे ताण हाताळणे हे मनासिक स्वास्थ्याचे लक्षण आहे. परंतु, ताण प्रमाणाबाहेर असल्यास व त्याचे समायोजन योग्य प्रकारे साधता न आल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होतात.

मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय कराल?

एकीकडे शरीर उत्तम दिसावे म्हणून वेगवेगळ्या ब्रॅन्डचे कपडेदागदागिनेवापरले जातात. जिम, सायकलिंगट्रेकिंगवेगवेगळे खेळ, डाएट ट्राय केले जातात. परंतु, मनाची मशागत करण्यासाठी विशेष कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मन हलकं फुलक ठेवण्यासाठी नव्या नजरेन आपण जगणं समजून घेण्यासाठी फार कुठला वेगळा खर्च अपेक्षित नसतो. फार वेगळ्या क्लासलाही जायची गरज नसते. अगदी साध्यासाध्या गोष्टीसुध्दा आपण आपल्या मनाच्या आरोग्यासाठी नक्कीच अंगीकारू शकतो. काय काय करता येईल त्यासाठीमनाचे आरोग्य बिघडल तर डॉक्टरांकडे जावेउपचार करून घ्यावेत हे तर उत्तमच. पण एरव्हीही  मानसिक आरोग्य बिघडू नये, म्हणून काही गोष्टी करता येतील. घरातल्याशी बोला, झोपजेवण व व्यायाम,  ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, परिस्थितीशी समायोजन करणे, जीवन संघर्षमय आहे हे मान्य करा, दुसऱ्यांना मदत करणे, शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे, समस्यांचा सामना करणे यासारख्या गोष्टीतून आपण आपले मानसिक आरोग्य सांभाळू शकतो.

मानसिक आरोग्यविषयी कोणाकडून मदत घ्यावी?

प्रशिक्षीत मनोविकृती तज्ज्ञमानसोपचार तज्ज्ञमानसशास्त्रज्ञमनोविकृती सामाजिक कार्यकर्ता तसेच जिल्हास्तरावर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमजिल्हा शासकीय रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रातील मनशक्ती मानसिक क्लिनिक इत्यादी ठिकाणी मानसिक आरोग्याविषयी उपचार व मदत मिळतील. 104, TeleMANAS 14416 आणि 1800 891 4416 या दूरध्वनी क्रमांकावर तज्ज्ञांची विनामुल्य सेवा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमच्या चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ श्रीमती सरिता शेडे यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم