मुरूमच्या नेहरू नगर भागात हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न
मुरूम (प्रतिनिधी) : येथील नेहरू नगर बस स्टँड पाठीमागील भागात कुमारी श्वेताताई बापूराव पाटील, स्मिताताई बापूराव पाटील, माजी नगराध्यक्षा अनिता अंबर, रशिदाबी शेख आदींच्या प्रमुख उपस्थितीत मकरसंक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते येथील हिप्परगा आई अंबाबाईचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते हळदी-कुंकू लावून तिळगुळ देऊन भेट स्वरूपात उपस्थित महिला भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या. कालिंदा देशट्टे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना मकरसंक्रांत सणानिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे महत्व सांगितले. नेहरू नगर व परिसरातील मिरजे प्लॉट, मालपाणी प्लॉट, संभाजी नगर, पोलीस स्टेशन परिसरातील बहुसंख्येने महिला भगिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या. शालिनी घोडके, जयश्री समाने, सुलभा वाडीकर, गायत्री समाने, स्वप्ना मडोळे, श्रद्धा साखरे, सोनाली सुतार, भूमिका मडोळे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिंदा देशट्टे यांनी केले. सूत्रसंचालन देवराज संगुळगे तर आभार सरोजा स्वामी यांनी मानले.
मुरुम, ता. उमरगा येथील हळदी कुंकू कार्यक्रमात श्वेताताई बापूराव पाटील, स्मिताताई बापूराव पाटील, अनिता अंबर आदींच्या हस्ते परिसरातील महिलांना साडया वाटप प्रसंगी
إرسال تعليق