औसा प्रतिनिधी -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, आजादी का अमृत महोत्सव समिती, लातूर जिल्हा आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आज महात्मा बसवेश्वर महाविद्यालयांमध्ये मशाल रॅलीचे आगमन झाले. यामध्ये सहभागी असलेल्या सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे उस्फुर्त स्वागत महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांच्या शुभ हस्ते पुष्पवृष्टी करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक अॅड.श्रीकांतप्पा उटगे, सदस्य अशोकप्पा उपासे, प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, लातूर जिल्हा आजादी का अमृत महोत्सव समितीचे सदस्य डॉ.भास्कर नल्ला रेड्डी, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती समन्वयक डॉ.संजय गवई, रॅली सहभागी मार्गदर्शक डॉ.गौरव जेवळीकर, डॉ.साईनाथ उमाटे, डॉ.किरण गुट्टे, डॉ. कल्याण सावंत, डॉ.सुदर्शन पेंडगे, सहभागी विद्यार्थी आदित्य गायकवाड, बिरादार महालसंकत, मारोती बिरादार, महादेव हळ्ळाले, विजय काळगे, अनिकेत वाघमारे, टेकाळे सुरेश, सुदर्शन सोनटक्के, नागमूळे श्रीनिवास आणि चंद्रकांत तेलंगे यांची उपस्थिती होती.
या मशाल रॅलीचे उद्घाटन दि.२० जानेवारी २०२३ रोजी पानगाव येथे शहीद बालाजी माले स्मारक येथे झाले. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात जाऊन सामूहिक शपथ आणि चित्र प्रदर्शनाने प्रबोधन करून राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
आज महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सभागृहामध्ये प्रबोधनपर कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. यावेळी सहभागी मार्गदर्शक प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.साईनाथ उमाटे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश मौने मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा आजादी का अमृत महोत्सव समितीद्वारा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मशाल रॅलीला संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मशाल रॅली आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र अभिमान आणि राष्ट्रभक्ती निर्माण केली जाते असे ते म्हणाले. डॉ.सुदर्शन पेंडगे यांनी सर्वांना शपथ दिली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयांमध्ये विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आयोजित केले जातात. आज मशाल रॅलीचे स्वागत करण्याचा योग मला मिळाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय गवई यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती आणि क्रीडा विभागातील प्राध्यापक, बालाजी डावकरे, अशोक शिंदे, शुभम बिराजदार, श्रीकृष्ण बडगिरे, सय्यद जलील, महादेव कोरे आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق