नकुलेश्वर बोरगाव येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा

नकुलेश्वर बोरगाव येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा. 
भेटा प्रतिनिधी -औसा तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर ग्रामस्थांच्या वतीने बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये चाकरवाडीचे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची मूर्ती दि.२६ जानेवारी रोजी विराजमान होणार असून या निमित्ताने दि.२४ ते ३१ जानेवारी या कालावधीत मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा,कलशारोहन,भागवत कथा,अखंड हरीनाम सप्ताह अशे विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. 
या धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ दि.२४ जानेवारी रोजी सुरू होऊन ३१ जानेवारी रोजी सांगता होणार आहे.मुर्तीप्राण प्रतिष्ठापणा दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते तसेच भागवत कथाकार ह.भ.प.भागवाताचार्य शाहू महाराज भारती आणि कलशारोहन सोहळा दि २६ जानेवारी रोजी ह.भ.प.बालयोगी ब्रम्हमुर्ती बाबाजी महाराज चाळक आळंदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
बोरगाव ग्रामस्थांनी भादा-बोरगाव रस्ता लगत भव्यदिव्य असे मंदिर बांधून पूर्ण केले.या धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم