संत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधनाची चळवळ चालवली - प्राचार्य डॉ. दिनेश मौने.

 संत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधनाची चळवळ चालवली - प्राचार्य डॉ. दिनेश मौने





लातूर : संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधनाची चळवळ आधुनिक काळात महाराष्ट्रभर चालवली असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश मौने यांनी केले ते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष ‌कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा.डॉ.संतोष शेटे, प्रा. मारुती माळी, प्रा. सागर ठाकूर, श्री. नामदेव बेंदरगे, श्री. विनायक लोमटे, वीरशेन उटगे,श्री. योगेश मोदी, श्री. रत्नेश्वर स्वामी,श्रीमती शेटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ.दिनेश मौने म्हणाले की, संत गाडगे महाराज हे माणसात देव शोधणारे संत होते. स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी आयुष्यभर शिक्षणाचा ध्यास घेतला. मुलाबाळांना शिकवा. पैसे कमी पडले तर सोने विका. गरज पडली तर घरातील भांडीकुंडी विका. वेळच आली तर फाटके कपडे घाला. पण पोराबाळांना शिकवा. हा संदेश आयुष्यभर त्यांनी दिला. हातातल्या खराट्याने दिवसभर गावातील घाण साफ करणारे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण साफ करणारे संत गाडगे महाराज म्हणजे एक अद्वितीय असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचार, आचार आणि कार्याचा वारसा आपण प्रत्येकांनी पुढे चालवला पाहिजे. असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मारुती माळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. सागर ठाकूर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीशैल्य पाटील, श्री लांडगे, यशपाल डोरमारे, योगीराज माकणे, राम पाटील, संदीप मोरे, आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم