शारदा इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

 शारदा इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

 लातूर - येथील शारदा इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
 कवी योगिराज माने यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील होते.यावेळी माजी कुलगुरू मधुकर गायकवाड, आहारतज्ज्ञ डॉ. दत्ता अंबेकर, स्कूलचे प्रशासक एल. एम. पाटील, स्कूलचे प्राचार्य डॉ. अभिषेक शर्मा उपस्थित होते.यावेळी योगिराज माने यांनी विविध कविता सादर उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, चित्रपट गीतांवर नृत्य सादर केले. अनेकांनी विविध कला गुणांचे दर्शन उपस्थितांना देवून आनंदीत केले. या स्नेहसंमेलनास पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم