बी आय एस तर्फे जिल्हयातील विभाग प्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न

 बी आय एस तर्फे जिल्हयातील विभाग प्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न

 

उस्मानाबाद:- पुण्यातील बीआयएसतर्फे आज जिल्‍हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्‍या  जिल्‍हा प्रमूखांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थांनी  अपर जिल्‍हाधिकारी शिवाजी शिंदे तसेच जिल्‍हापूरवठा अधिकारी स्‍वाती शेंडे होत्‍या.

         या बैठकीला उपसंचालक  निशा कणबर्गी व ज्ञानप्रकाश उपस्थित होते. निशा कणबर्गी यांनी विविध विभागांच्‍या जिल्‍हास्‍तरीय अधिका-यांना त्‍यांच्‍याशी संबधित मानके,बीआयएस उपक्रमांची माहिती दिली. बीआयएस केअर अॅप आणि बेवसाइटव्‍दारे  विशिष्‍ट उत्‍पादनासाठी भारतीय मानक कसे तपासले जाऊ शकतात आणि बीआयएस परवानाधारकांचा शोध कसा घेतला जाऊ  शकतो हे दाखविण्‍यात आले. श्रीमती  कणबर्गी यांनी उस्‍मानाबाद प्रशासनाला बीआयएस प्रमाणित उत्‍पादनांचा आग्रह धरण्‍याचे आवाहन केलें हा कार्यक्रम आयोजित करण्‍याची संधी दिल्‍याबद्ल त्‍यांनी उस्‍मानाबाद जिल्‍हयाचे आभार मानले. तसेच अशा बैठकांमुळे शिर्डी संस्‍थांन देवस्‍थानने पुढाकार घेऊन प्रसाद तयार करण्‍यासाठी आयएसआय चिन्‍हांकित तूप वापरण्‍यास सुरूवात केल्‍याचेही त्‍यांनी नमुद केले.

        यावेळी जिल्‍हपुरवठा अधिकारी आणि इतर विभागाच्‍या प्रमुखांनी शासकिय खरेदीवेळी निविदा  मध्‍ये भारतीय मानके आणि बीआयएस प्रमाणित वस्‍तुंचा संदर्भ देण्‍याचे मान्‍य केले. तसेच बीआयएस विशेषतः हॉलमार्किग आणि बीआयएस केअर अॅपच्‍या उपक्रमांची माहिती देण्‍यात आली.यापुढे विविध विभाग प्रमुखांनी तळागाळात चांगल्‍या परिणामासाठी ग्राहकांसोबत अनेक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्‍यावर भर देण्‍यात यावा असे सांगीतले सरकारी शाळा आणि अभियांत्रिकी महाविदयालयातील स्‍टँडर्ड क्‍लबबद्लही  माहिती देण्‍यात आली. उपस्थित सर्व अधिका-यांनी बीआयएसच्‍या उपक्रमाचे कौतूक केलें व अध्‍यक्षांचे आभार मानले

 

Post a Comment

أحدث أقدم