लक्ष्मीबाई ढेंगरे विद्यालयाचे शैक्षणिक कार्य उत्कृष्ट-मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

लक्ष्मीबाई ढेंगरे विद्यालयाचे शैक्षणिक कार्य उत्कृष्ट-मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल





औसा प्रतिनिधी- तालुक्यातील फत्तेपूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन समारंभावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल बोलत होते. यावेळी म्हणाले की, आपल्या शाळेचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे आदर्श नागरिक घडतील या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच विविध क्षेत्रात संस्थेचा व गावाचा नावलौकिक होईल.यासाठी शाळेला व फत्तेपूर गावाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. असेही यावेळी प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व्यंकटराव पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर गोरे,ॲड. बाबुराव मोरे,संस्थेचे कोषाध्यक्ष दयानंद चव्हाण, बालाजी जाधव, फत्तेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता माळी,विस्ताराधिकारी राम कापसे,संत शिरोमणी मारुती सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव साळुंखे, सोसायटीचे चेअरमन ज्योतीराम साळुंखे,संस्थेचे सचिव प्रा. दत्तात्रय सुरवसे यांच्यासह परिसरातील सरपंच, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नौबदे सर, कांबळे सर यांच्यासह विद्यार्थिनी सानिका पांचाळ अंकिता दळवे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रा. दत्तात्रय सुरवसे यांनी केले तर या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट नियोजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल मुळे यांच्यासह शिवराम शिंदे,गोविंद देशपांडे, गणपतराव जाधव,कात्रे सर,जाधव सर, चव्हाण सर, सूर्यवंशी सर, क्षिरसागर सर,बिराजदार सर, कल्याणी श्रीशैल्य यांच्यासह शाळेतील इतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.यावेळी परिसरातील माजी विद्यार्थी,पालक, विद्यार्थी विद्यार्थिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या वार्षिक स्नेहसंमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,लावणी, पोवाडे,कीर्तन यावेळी सादरीकरण केले.

Post a Comment

أحدث أقدم