कॉक्सिट’ ने गुणवत्तेसोबतचशिस्त जोपासली- डॉ. दीपक बच्चेवार

 कॉक्सिट ने गुणवत्तेसोबतचशिस्त जोपासली- डॉ. दीपक बच्चेवार

विद्यापीठ गुणवत्ता यादीत आलेल्या १६ विद्यार्थ्यांचा गुणगौरव





 लातूर- कॉक्सिटने गुणवत्तेच्या जोरावर महाविद्यालयाचे नाव मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले आहे, महाविद्यालयाने गुणवत्तेसोबतच शिस्तही जोपासली असल्याचे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार यांनी काढले.
 २०२२ मध्ये विविध पदवी व पदव्युत्तर विभागांच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये  येथील कॉक्सिटच्या १६ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्तायादीत स्थान झळकावले आहे. त्या गुणवंतांसह पालकांचा सत्कार नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा हाडोळती येथील कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, टे्रनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, विभागप्रमुख डॉ. नितीन वाघमारे, प्रा. माकणीकर उपस्थित होते.
 डॉ. दीपक बच्चेवार म्हणाले, आमच्या काळात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व होते. या काळात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कौशल्यपूर्ण शिक्षणाला अधिक महत्व आहे. डॉ. एम. आर. पाटील यांनी स्वतः च्या नोकरीचा राजीनामा देऊन कॉक्सिट महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू केलेले संगणकशास्त्राचे कौशल्यपूर्ण शिक्षण ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडत आहे. त्यांनी जोपासलेल्या गुणवत्तेच्या परंपरेमुळे येथील विद्यार्थी आज मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जात आहेत. यामुळेच कॉक्सिटचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात अग्रक्रमावर आहे, असे ते म्हणाले.
 यावेळी अध्यक्षीय समारोप करताना डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, अलिकडच्या काळात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ताधारक होण्यासोबतच स्वतःला विकसित करण्यासाठी धडपड करण्याची गरज आहे. संगणकशास्त्रात दररोज अनेक नव्या अपडेट येत आहेत, त्यात परिपूर्ण होऊन स्वतः नवीन गोष्टींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करावेत. तेच विद्यार्थी या जागतिक स्पर्धेत टिकू शकतात. हे ज्ञान वाढवत असतानाच प्रत्येकाने कमावते होऊन आर्थिक गरज पूर्ण केली पाहिजे, तो व्यक्ती समाजात नावारुपाला येईल, असे ते म्हणाले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाने मागील २२ वर्षांत केलेल्या वाटचालीचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन प्रा. कैलास जाधव यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم