"गट शेती ही काळाची गरज"- प्रा. डॉ. शाहुराज मुळे यांचे प्रतिपादन

  "गट शेती ही काळाची गरज"- प्रा. डॉ. शाहुराज मुळे यांचे प्रतिपादन






    आज शेती परवडत नाही, शेतीचा खर्च अधिक वाढला आहे अशी भावना सर्व शेतकरी व्यक्त करताना दिसतात हे काही यांची खरे पण आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात विभाजन व तुकडीकरण झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर होण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन समूह किंवा गट शेती करणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतििपाद समता शेतकरी स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शाहुराज मुळे यांनी व्यक्त केले. ते अंदोरा ता औसा येथे आयोजित नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.  
      सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे हे उपस्थित होते. त्यांनी शेतकरी गटासाठी मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली आणि शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचा फायदा होतो हे लक्षात आणून दिले.
        प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये सरपंच ॲड. आसगर पटेल, उपसरपंच बालाजी मुळे यांचा सत्कार मा. नारायण लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. तर सदस्य गुंडू पठाण, जहीर पठाण, बाळू ढोबळे, आयुब पठाण, शामीर पठाण, वाजिद पठाण, हरिश्चंद्र रसाळ, मेहबूब शेख इत्यादी सदस्यांचा सत्कार समता शेतकरी गटाच्या विविध संचालकांच्या हस्ते करण्यात आला. सदरील कार्यक्रमात सोसायटीचे चेअरमन नयुम पटेल, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेरखाॅं पठाण यांचाही सत्कार शेतकरी गटाकडून करण्यात आला. 
            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकरी गटाचे उपाध्यक्ष सागर आंबेकर, सचिव गोपाळ लोकरे, कोषाध्यक्ष आगतराव पवार, संचालक हारून शेख, करण पवार, धनराज जावळे, मयूर मुळे, समाधान जावळे, इत्यादींनी परिश्रम घेतले.  या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षक अंगद पांचाळ यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم