२०२३ चे बजेट ग्रीन ग्रोथ बजेट – पाशा पटेल

 २०२३ चे बजेट ग्रीन ग्रोथ बजेट – पाशा पटेल

लातूर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2023-24 साठीचा केंद्रीय बजेट नुकताच सादर केला. या बजेट मध्ये विविध उपाययोजना च्या माध्यमातून पर्यावरण पूरक तरतुदी भरघोस प्रमाणात केलेल्या आहेत. तसेच कार्बन उत्सर्जन शून्य करण्याचा संकल्प केला आहे. ज्यामध्ये ग्रीन एनर्जी करिता ३५ हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. देशभरात २०० बायोगस प्रकल्पाची निर्मिती करणे. हायड्रोजन मिशन करिता १९७०० कोटी रुपये, अक्षय योजना २०७०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन व इलेक्ट्रिक सायकल च्या वापर करणे करिता विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत.

          ग्रामीण भागातील विकासाकरिता ६५ हजार सहकारी संस्था ची निर्मिती करून या माध्यमातून ग्रामीण लोकांना शेतीभिमुख लघु उद्योगांना आर्थिक सहायता केली जाणार आहे. शेती मालाच्या साठवनुकी करिता ग्रामीण भागात कोल्ड स्टोरेज व गोदाम निर्मिती केली जाणार आहे. देशातील डाळ उत्पादन वाढीकरिता विशेष डाळ हब ची निर्मिती केली जाणार आहे. फलोत्पादन करिता २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. लघु व सूक्ष्म उद्योग वाढीकरिता विशेष पकेज ची निर्मिती केली जाणार आहे. तसेच बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे करिता ८१ लाख बचत गटांना आर्थिक सहायता करण्यात येणार आहे.

जगातील पाचवी आर्थिक महासत्ता होऊ पाहणारा भारत देश ग्रामीण भागातील सर्वांगीण  विकासासोबत लक्षपूर्तीचे उद्दिष्ट्य गाठण्याचा प्रयत्न २०२३ च्या आर्थिक बजेट मध्ये करण्यात आलेला आहे. या बजेट च्या माध्यामतून संपूर्ण जगाला पर्यावरण पूरक अर्थव्यवस्था निर्मिती करण्याचे दिशा देण्याचे  काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून होणार आहे.

आम्ही मागील पाच वर्षापासून पर्यावरणामध्ये काम करीत असून २०२३ वर्षीचे आर्थिक बजेट हे ग्रीन ग्रोथ या संकल्पनेला प्रेरित असल्याने आम्हाला या बजेट चा सार्थ अभिमान आहे. या बजेटच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखून मानव जातीचे रक्षण व देशातील दुर्बल वंचित व शेतकरी वर्गाचे हित जोपासण्याचे काम होणार आहे. त्या बद्दल देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे जाहीर अभिनंदन व आभार. 

Post a Comment

أحدث أقدم