श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित पशुप्रदर्शनाचे पारितोषिक वितरण

 श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित पशुप्रदर्शनाचे पारितोषिक वितरण


    लातूर/प्रतिनिधी:ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित पशुप्रदर्शनाचे पारितोषिक वितरण बाजार समितीचे माजी सभापती तथा देवस्थानचे विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग व देवस्थानच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 
    या प्रदर्शनात देवणी लाल कंधार नर गट,देवणी लाल कंधार मादी गटातून जिल्ह्यातील अनेक पशुपालकांनी आपली जनावरे प्रदर्शनामध्ये आणली होती.नर गटातून चॅम्पियन म्हणून नळेगाव येथील वैभव शिरूरे यांच्या वळूची निवड करण्यात आली.लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा चांदीचा रथ,मानाचा फेटा,हार,शाल,
श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.देवणी मादी गटात हासेगाव येथील श्रीपती लवटे यांचा प्रथम क्रमांक आला.सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांना ५००१  रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
   यावेळी बाजार समितीचे सचिव सतिष भोसले, हांडे,देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजकुमार पडीले, डॉ.नानासाहेब कदम,डॉ.सुभाष बुकशेटवार,कृषीचे विशाल झांबरे ओम गोपे,राजेंद्र पतंगे,सचिन आलमले,सुरेश गोजमगुंडे, वेंकटेश हालिंगे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم