माझं घर शेल्टर होमचे डॉ.विठ्ठल लहाने यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 माझं घर शेल्टर होमचे डॉ.विठ्ठल लहाने यांच्या हस्ते होणार उद्घाटन

लातूर- शिक्षणापासून वंचित तसेच स्थलांतरीत बालकांसाठी गेेली तीन वर्षांपासून लोकसहभागातून माणूस प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने चालविण्यात येणार्‍या माझं घर या निवासी प्रकल्पाच्या बुधोडा(वांगजेवाडी कारंजेखडी केंद्र,औसा रोड) शेल्टर होमचे उद्घाटन रविवार,दि.१९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता प्रसिध्द प्लॉस्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांच्या हस्ते,ज्येष्ठ  विचारवंत प्रा.सुभाष भिंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
होमिओपॅथी अकॅडमी ऑफ रिसर्च अँंड चॅरिटेबल ट्रस्ट परभणी व मुंबईच्या डॉ.लीना बागडिया यांच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या माझं घर,शेल्टर होम उद्घाटन  कार्यक्रमाला सुक्ष्म जीवशास्त्र तज्ञ प्रा.डॉ.शिवा आयथळ,डॉ.लीना बागडिया, डॉ.प्रमोद मुळे,प्रा.डॉ.वसुंधरा गुडे, एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, सामाजिक कार्यकर्ते हरिश्‍चंद्र सुडे, साने गुरुजी शाळेचे संस्थापक शेषराव चव्हाण, ज्येष्ठ शेतकरी नेते लक्ष्मणराव वंगे, लातूर वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर बदामे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख शरद झरे,संगीता शरद झरे, संयोजन समितीचे विवेकानंद चामले, प्रा.सुधीर साळुंके, चंद्रशेखर कत्ते, संतोष साखरे, लिंबराज बिराजदार, देवराव देशमुख, पांडुरंग मोरे, श्रीनिवास बडूरे, वेदप्रकाश भूसनूरे, सोपान पवार, राहूल लोंढे, शरद कोळपे, प्रा.सुनील गुरनाळे, प्रा.संतोष बडूरकर, डॉ.स्मिता फडवणीस, राधा कोरके, कॉ.रेशमा भवरे, वंदना गायकवाड आदिंनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم