होळीनिमित्त लातुरात रंगला बंजारा समाजाचा लेंगी महोत्सव

 होळीनिमित्त लातुरात रंगला बंजारा समाजाचा लेंगी महोत्सव


लातूर : प्रतिनिधी
होळी सणाच्या निमित्ताने लातुरात गोर सेना गोर शिकवाडी यांच्या वतीने भव्य लेंगी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा महोत्सवात एकूण २० संघ सहभागी झाले होते. या निमित्ताने गोर सेनेने दिली पारंपारिक उत्सवाला चालना दिली आहे. या महोत्सवासाठी बंजारा समाजातील पारंपारिक वेशभूषेत पुरुष आणि महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पूजन आणि भोग लावून करण्यात आली. या लेंगी महोत्सवाच्या निमित्ताने मान्यवर मंडळींच्या हस्ते लकीशा बंजारा चौक तसेच किशनराव जाधव मार्ग नामफलकाचं अनावरण करण्यात आले. सायंकाळी नयनरम्य वातावरणात बंजारा समाजातील गीत गायन करीत नृत्याविष्कार सादर करण्यात आला. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे गोर शिकवाडीचे हसाबी आर. सी. चव्हाण, महाराष्ट्र दल प्रमुख एल. टी. चव्हाण, सिकवाडी संयोजक बळीराम जाधव आदी गोरसेना पदाधिका-यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील २० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. लेंगी महोत्सवाचे प्रथम पारितोषिक अशोक राठोड पुरस्कृत रोख ११ हजार रुपये, प्रशस्ती पत्र सामकी माता या पथकांनी पटकावले, द्वितीय पारितोषिक आनंद क्लिनिक डॉ. देवानंद राठोड पुरस्कृत ७००१ रुपये रोख जयभवानी लेंगी पथक यांनी तर तृतीय पारितोषिक रवीभाऊ चव्हाण पुरस्कृत ३७५५ रुपये रोख नायक लेंगी पथक यांनी पटकावले आहे.या वेळी मराठवाड्यातून सामकी माता लेंगी पथक, तोलाराम लेंगी पथक, वसंतराव नाईक लेंगी पथक, सेवालाल लेंगी पथक आदी लेंगी संघांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे आयोजन गोर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक चव्हाण, जिल्हाध्यक्ष बबलू जाधव, शिकवाडीचे सुरेश राठोड, प्रसाद पवार, जयसिंग जाधव, संतोष पवार, शरद राठोड, दयानंद राठोड, बालाजी राठोड, रवी चव्हाण, दयानायक राठोड, शिवाजी राठोड यांच्यासह गोर सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.

Post a Comment

أحدث أقدم