ज्यांचा राजकीय जन्म सर्वधर्म समभाव असलेल्या काँग्रेसमध्ये झाला, त्या कव्हेकर परिवाराने भाजपच्या नावाखाली भगवान श्रीरामाला पुढे करून शहरातील वातावरण गढूळ करू नये. -सुंदर पाटील कव्हेकर

 ज्यांचा राजकीय जन्म सर्वधर्म समभाव असलेल्या काँग्रेसमध्ये झाला, त्या कव्हेकर परिवाराने भाजपच्या नावाखाली भगवान श्रीरामाला पुढे करून शहरातील वातावरण गढूळ करू नये. -सुंदर पाटील कव्हेकर 







लातूर/प्रतिनिधी:- संपूर्ण भारत देशामध्ये भगवान राम यांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना त्याच पार्श्वभूमीवर लातूर शहर महानगरपालिका प्रभाग 18 मधील पटेल नगर लातूर येथे गेली 30 वर्षाची परंपरा असलेल्या श्री राम हनुमान मंदिरात जे मंदिर सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे ज्या मंदिर ट्रस्टवर मुस्लिम बांधव आहेत. श्रीराम हनुमान मंदिर देवस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चार दिवसापूर्वी भाजपात आलेल्या कव्हेकर परिवारातील प्रिन्स अजित पाटील यांनी जणू काही राम ही भाजपची मालमत्ता आहे असाच अविर्भाव दाखवून, लातूरच्या संस्कृतीला गालबोट लागेल असे वर्तन व विधान केले.  धार्मिक कार्यक्रमात भाजपचे पोती पुराण वाचल्याप्रमाणे भाजपामुळेच भगवान राम नावारूपाला आले भाजप म्हणजे राम आणि राम म्हणजे भाजप असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ज्यातून सर्वधर्म समभावाची असलेली आपली संस्कृती व शांत व संयमी अशी ओळख असलेल्या लातूर शहराच्या प्रतिमेला धक्का बसेल अशीच ती कृती आहे. खरे तर अश्या पावन ठिकाणी राजकारणाचे जोड़े बाहेर ठेऊन समाजाला दिशा देणारे वक्तव्य, वर्तन आवश्यक असताना कोठेही गेले तर स्वार्थी राजकारण ही भाजपातील कव्हेकर परिवाराची जी खासियत आहे त्याचे दर्शन आज प्रभाग क्रमांक १८ मधील पटेल नगर लातूर येथील सार्वजनिक भगवान राम जन्मोस्तोव सोहळा मध्ये अजित पाटील कव्हेकर यांनी दिले जे खूप दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे या भाजपातील कव्हेकर परिवाराचा राजकीय जन्म सर्वधर्म समभाव असलेल्या, व ज्यांच्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत त्या कॉंग्रेसमध्ये झाला त्या कॉंग्रेसच्या नावाने आपली राजकीय दुकानदारी बसवली संस्था घेतल्या व अब्जो रुपये कमाविले व आज तेथे आपली डाळ शिजत नाही हे दिसताच कॉंग्रेसला शिव्या देत भाजपामध्ये उडी घेऊन मोठी मोठी स्वप्न जनतेत विश्वासहर्ता नसताना बघितली जात आहेत. व हे करताना शहराचे वातावरण गढूळ करण्याचे पाप हे भाजपातील कव्हेकर परिवार करत आहे. अर्थात या परिवाराला आपल्या संकुचित बुद्धी राजकीय स्वार्थापुढे काहीच दिसत नाही हा इतिहास आहे हे कांही वेगळे सांगायला नको. मात्र आजच्या पावन दिवसाचा व त्यातल्या त्यात मंदिरात कार्यक्रम असताना जर पक्षाची गुणगान करत राम म्हणजे भाजपची मक्तेदारी आहे असा आव आणत म्हणजे स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी शहराचे वातावरण गढूळ केले जात असेल तर हे अशोभनीय असेच कृत्य आहे. प्रत्येकाच्या मनात भगवान राम यांच्यावीषयी आदर व सन्मान आहे. मात्र भगवान रामाच्या नावाने जर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी उपयोग केला जात असेल तर हे दुर्दैव आहे. जनतेनी देखील अश्या सडक्या मनोवृतीला अधिक बळ न देता आपली संस्कृती अबाधित राहील असे काम करत सर्व समाजाला दिशा देण्याचे काम करत राहावे असे मत लातूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हा संघटक व प्रभाग क्रमांक 18 चे अध्यक्ष सुंदर पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم