लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लाइनमन डे साजरा


लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लाइनमन डे साजरा

         औसा प्रतिनिधी -हासेगाव ता औसा जि लातुर येथील वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव येथे लाइनमन डे साजरा करण्यात आला.
 
     देशभरातील लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारने ४ मार्चला देशभर लाइनमन दिवस करण्याचे योजीले होते.त्यानिमीत्ताने लोदगा शाखा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ विनोदकुमार रूपनावर यांचा पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

         प्रा.कदम जी जे यांनी प्रास्ताविक भाषण केले , त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री रूपनावर यांनी कामातुन आपली ओळख व्हावी , सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे , कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते असे विद्यार्थ्यांना संबोधित केले.यावेळी गुरव सुदर्शन,शुभम गोरे , साठे समाधान व प्रा. कल्याणकर एस ए यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
   या कार्यक्रमात वीज सुरक्षेतेबाबत प्रबोधन करण्यात आले वीज सुरक्षाची उपस्थितांना शपथ देण्यात आली.यावेळी आय. टी.आय. निदेशक साठे एस बी , बेस्के के बी , कांबळे के जी यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रा.गिरी डी डी यांनी व्यक्त केले.

    यावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे , सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य संतोष मेतगे , प्राचार्या योगिता बावगे, बिराजदार डी एस, प्रा.गायकवाड एस एन, प्रा पंचाक्षरी एस एम, प्रा. पाटील डी पी , प्रा. ताडके के डी, प्रा.तांबोळी जी पी , पाटील ए आर, ग्रंथपाल सवाई मनदीप , माने एस एस व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم