‘एकच मिशन जुनी पेन्शन’साठी संघटना आक्रमक

 ‘एकच मिशन जुनी पेन्शन’साठी संघटना आक्रमक

v  संप आणखी तीव्र करण्याचे मध्यवर्ती संघटनेचे आवाहन

v  संपामध्ये कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

लातूर,दि.14 : जिल्ह्यातील   शासकीय-निम  शासकीय आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करत  बेमुदत संपास सुरुवात झाली. ‘एकच मिशन जुनी पेन्शन ’ म्हणत कर्मचाऱ्यांनी संपात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

महानगरपलिकासमोर टॉऊन हॉल येथून  छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामोर्चाचा समारोप झाला. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विविध संघटनांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सक्रिय सहभाग घेत पाठिंबाही दिला. या संपात सुरुवातीस लातूर शहरातील  हजारोंच्या संख्येने शासकीय-निमशासकीय-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक तहसील कार्यालयाच्या आवारातही कर्मचाऱ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. पुढील काही दिवस हा संप सुरूच राहणार असून यासाठी विविध संघटनांचे सहकार्य मिळणार असल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक तथा जिल्हा सरचिटणीस संजय कलशेट्टी म्हणाले. जुन्या पेंशन योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन अधिकाधिक संख्येने कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.

कलशेट्टी म्हणाले, जुनी पेंशन योजना ही भविष्यात सेवानिवृत्तीनंतर  जगण्याचा आधार आहे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष करावा लागेल. शासनाने जुनी पेंशन योजना लागू करावी, यासाठी बेमुदत संप राज्य मध्यवर्ती संघटनेने पुकारला आहे. या संपामध्ये नव्या व जुन्या पेन्शन योजनेतील सर्व कर्मचारी सक्रीय सहभाग घेत आहेत, ही आनंदाची बाब आहे.  तरीही जुनी पेंशन लागू करण्यासाठी मध्यवर्ती संघटना व  शासकीय-निम शासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असेही कलशेट्टी म्हणाले.

जिल्हाध्यक्ष बी .बी. गायकवाड, संस्थापक अध्यक्ष आर. एस. तांदळे, जिल्हा कार्याध्यक्ष महादेव पांचाळ, जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष संतोष माने, सचिव धुमाळ, तलाठी महासंघ जिल्हाध्यक्ष महेश हिप्परगे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अरविंद कुलगुर्ले, जुनी पेन्शन योजना राज्य समन्वयक  दीपक येवते, माहिती व जनसंपर्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक माळगे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन बनसोडे, दत्तात्रय सूर्यवंशी, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष मस्के, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भाई श्रृंगारे, संजीव लहाने, धनंजय उजनकर, ज्ञानेश्वर जाधव, बी. जे. गायकवाड, विश्वंभर माने, सुदेश परदेशी, मनोज बनकर, गोविंद गंगणे, हनमंत नागिमे, बालाजी फड, नितीन बनसोडे, गंगाधर एनाडले, बालकराम शिंदे, मंगेश पाटील, प्रथमेश वैद्य, उमेश सांगळे, अशोक किनीकर, मचिछद्र गुरमे, कृष्णा कोकणे, संजय जाधव, सुमित्रा तोटे, मोहोळकर जी.एस. रेणुका गिरी, सय्यद वाजीद आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थ‍ित होते.

संपाला कास्ट्राईब महासंघ, 42 संघटनांचा पाठिंबा

 संपामध्ये कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि समन्वय समितीतील 42 संघटनांनीही पाठिंबा देत सक्रीय सहभाग घेतला आहे. जिल्हा परिषद परिसरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सर्वच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत ‘एकच मिशन जुनी पेंशन’ म्हणत घोषणाबाजीही केली. शिवाय शासनाने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून जुनी पेंशन लागू करेपर्यंत संपामध्ये सहभागी राहणार असल्याचेही कर्मचारी म्हणाले.

Post a Comment

أحدث أقدم