जिल्हा क्रीडा संकुल येथे 15 एप्रिलपासून विविध खेळांचे मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर

 जिल्हा क्रीडा संकुल येथे 15 एप्रिलपासून विविध खेळांचे मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर

लातूर: राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा संकुल समिती, जिल्हा क्रीडा परिषद, क्लब अकॅडमी यांच्यामार्फत 15 ते 24 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये विविध खेळांचे मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात हे शिबीर होईल.

प्रशिक्षण शिबिरात कुस्ती, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, मैदानी, कराटे, लॉन टेनिस, जिम्नॅस्टीक, बॅटमिंटन, रायफल शूटिंग, बॉक्सिंग, स्केटींग, फुटबॉल, मल्लखांब, योगा व ज्युदो आदी खेळांचा समावेश आहे. या मोफत प्रशिक्षण शिबिरात सर्व खेळांची ओळख, तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन, विशेष राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची प्रशिक्षणास भेट, मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुलांच्यातील सूप्त गुणांना वाव देणे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडु घडविणे, हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी आपल्या शाळेमधील, संस्थेमधील विद्यार्थ्यांना सूचना देण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे (भ्रमणध्वनी क्र. 8275273917) यांच्याशी सपंर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم