आज उदगीरमध्ये महागायक आदर्श शिंदे यांची प्रबोधन संध्या
-( लातूर-प्रतिनिधी )
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने उदगीर येथे ( ता. १३) सायंकाळी महागायक आदर्श शिंदे यांच्या प्रबोधन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . खासदार सुधाकर शृंगारे यांनी या प्रबोधन संध्येचं आयोजन केले आहे . उदगीर शहरातल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर हा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमाचा उदगीरसह जळकोट तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आहे.
-- महागायक आदर्श शिंदे यांची प्रबोधन संध्या उदगीर शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा गायनाचा कार्यक्रम असणार आहे . यावर्षी सगळीकडेच जयंती उत्सवाचा जल्लोष पहायला मिळतो आहे . आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने हा जल्लोष द्विगुणित केला आहे . या कार्यक्रमात आदर्श शिंदे यांनी जयंतीच्या निमित्ताने नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणलेली आहेत . त्यामुळे उदगीर आणि जळकोटकराना आदर्श शिंदे यांची अनेक नवीन गाणी ऐकायला मिळणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम उदगीर मध्ये होतो आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. महिला ,मुलांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे . सायंकाळी ठीक सात वाजता हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. मध्यरात्री फटाक्यांची आतिषबाजी झाल्या नंतर आदर्श शिंदे यांच्या या प्रबोधन संध्येची सांगता होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने आंबेडकरी अनुयायी , जळकोट आणि उदगीर तालुक्यातील नागरिक यांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आहे .
إرسال تعليق