आ.धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त सर्व रोग निदान शिबीर संपन्न

आ.धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त सर्व रोग निदान शिबीर संपन्न

 औसा / प्रतिनीधी-लातूर ग्रामीणचे आ.तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन,धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लातूर युवक काॅग्रेस उपाध्यक्ष अजित दयानंद शिंदे यांच्या संकल्पनेतून बिरवली येथे उजनी प्राथमिक आरोग्य केंद्र व लातूर ग्रामीण युवक काॅग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने बिरवली येथे सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले.या शिबीरांचे उद्घाटक लातूर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे,प्रमुख पाहुणे माजी उपाध्यक्ष जि.प नारायण लोखंडे भादा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे,सदाशिव कदम ,औसा काॅग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष दंतोपंत सुर्यवंशी उपस्थित होते यामध्ये जवळपास 220-240 रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
बिरवली येथील  जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात उजनी‌  आरोग्य केंद्र व लातूर ग्रामीण युवक काॅग्रेस च्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले होते. हे सर्व रोग निदान शिबिर उजनी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजपाल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ अबोली परूळकर,आरोग्य सहाय्यक संतोष तांदळे, यांनी रुग्णतपासणी केली. त्यांच्यासोबत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक योगेश गरड,अहिल्या काळे,के. जी निसाले 
 आशा स्वयंसेविका रंजना ग्रँड,महानंदा पांचाळ यांनी सहकार्य केले.
या शिबिरात गावातील व परिसरातील जवळपास 220-240 रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, दमा, कर्करोग, थायरॉईड, क्षयरोग आदी तपासण्या केल्या गेल्या, तर इतर आजारांच्या सुद्धा तपासण्या करण्यात आल्या. यास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.या शिबीर उद्घाटन प्रसंगी विलासराव देशमुख युवा मंचचे अध्य‌क्ष रवि पाटील,माजी संचालक कृषी उत्पन बाजार समिती नामदेव माने,बिरवली गावच्या सरपंच अनिता चध्हाण
गोरख सावंत चेअरमन टाका,ग्रामसेवक कांबळे,उपसरपंच अमित पाटील, अप्पासाहेब घाडगे,शाम सुर्यवंशी,विठ्ठल पांचाळ,गुणवंत कदम,प्रल्हाद कदम,श्रीनिवास मुळे, राम भोंग,हरेश्र्वर करंडे तानाजी पाटील,हरेश्र्वर करंडे,बजरंग कदम,सचीन शिंदे,शुभम बाजुळगे,सोहेल तांबोळी,अल्ताफ शेख,बालाजी गरड,प्रसाद चव्हाण, अक्षय कदम यांच्यासह अनेक काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमांचे सुत्रसंचालन गोविंद पवार यांनी केले तर प्रास्ताविक व आभार अजित शिंदे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم