औसा तालुक्यात सामाजिक सलोखा कौतुकास्पद

 औसा तालुक्यात सामाजिक सलोखा कौतुकास्पद

औसा : प्रतिनिधी-मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात सर्व धर्मीयांनी मिळून साजरा करावा व या सणानिमित्त सामाजिक सलोखा राखण्याचे कार्य औसा तालुक्यातील होते हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले. सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी दि १४ एप्रिल २०२३ रोजी औसा येथील हाश्मी फंक्शन हॉल येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित इफ्तारीत मुस्लिम बांधवांसोबत उपस्थितीत राहून पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या .

यावेळी समवेत माजी आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड श्रीपतराव काकडे ,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे,औसा तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख, जि.प.चे माजी उपाध्यक्ष शेषेराव पाटील, रामदास चव्हाण, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, व्हाईस चेअरमन शाम भोसले, मौलाना कलीमल्लाह, अ‍ॅड. समियोद्दीन पटेल., अजहरुल्ला हाशमी, आदमखां पठाण, अ‍ॅड. शाहनवाज पटेल, अ‍ॅड, फैय्याज पटेल, माजी नगरसेवक अंगद कांबळे, अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष हाजी सय्यद अब्दुल हमीद, माजी नगराध्यक्ष खादर शेख, अनिस जहागीरदार, पाशा शेख, इस्माईल शेख, विलासराव देशमुख युवा मंचचे तालुकाध्यक्ष रवी पाटील, शहराध्यक्ष खुंनमीर मुल्ला. मजम्मील शेख, हमीद. गितेश शिंदे, शिवसेना शहर प्रमुख सुरेश भुरे, फय्युम शेख यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم