आमदार चषक सामन्याचे पारितोषिक वितरण

 आमदार चषक सामन्याचे पारितोषिक वितरण


रेणापूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक २०२३ तालुक्यातील लखमापूर पाटी येथे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी दि. ११ रोजी सेमी फायनल व फायनल सामने झाले. यात विजयी संघाला रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे व सरपंच प्रभाकर केंद्रे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले.

माजी उपसरपंच तथा तालुका कॉग्रेसचे सरचिटणीस महेश खाडप व युवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चषक २०२३ चे दि. १ ते ११ एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दि. ११ रोजी सेमी फायनल व फायनल सामने अटीतटीचे झाले. फायनल सामना आनंदवाडी विरूद्ध रामवाडी असा होता. यात रामवाडी संघाने आमदार चषक २०२३ प्रथम , द्वित्तीय आनंदवाडी संघाने ंिजकला. प्रथम द्वित्तीय , तृतीय, चतुर्थ आलेल्या संघाला रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे व सरपंच प्रभाकर केंद्रे, अंगद जाणकर , महेश खाडप यांच्या उपस्थितीत पारितोषीक देण्यात आले..

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनाथ खाडप, तुषार जोगदंड, लक्ष्मण भिसे, अरुण धायगुडे, भाऊसाहेब खाडप,ओम खाडप, तानाजी खाडप, नारायण धायगुडे,अक्षय खाडप, सदाशिव खाडप,मारुती खाडप, महादेव खाडप, बालाजी पांचाळ, विष्णू खाडप, किशोर खाडप, दिपक खाडप, सिद्राम इंगळे, बाळासाहेब जाणकार, अंगद (नाना) जाणकार, दत्ता धायगुडे, बालू खाडप,विकास खाडप, ज्ञानेश्वर खाडप, विलास धायगुडे,यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم