हासेगाव श्री वेताळेश्वर शिक्षण संकुलांत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

  हासेगाव श्री वेताळेश्वर शिक्षण संकुलांत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

   




     हासेगाव- येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेत  थोर समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक,स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांची जयंती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानेने साजरी करण्यात आली.यावेळी  या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी सैनिक वैजनाथ अप्पा जेवळे संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ) संचालक श्री नंदकिशोर बावगे प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला, प्राचार्य डॉ वीरेंद्र मेश्राम इत्यादी मंचावर उपस्थित होते . या कार्यक्रमाची सुरवात   महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन  करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .
             सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत व समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. अस्पृश्य मुलांसाठी पुण्यात शाळा स्थापन केली. त्यांनी लिहिलेल्या 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली. 'नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे' हा विचार मांडणारे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. स्त्री व पुरुष यांच्यात भेदभाव न करता सर्वांनी एका कुटुंबाप्रमाणे, एकमताने सत्यवर्तन करून राहिले पाहिजे, असे त्यांचे विचार होते. असे प्रतिपादन कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी केले.
                   कार्यक्रमाला     ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री कालिदास गोरे , लातूर कॉलेज ऑफ फार्मसी  लातूर     , राजीव गांधी पॉलीटेकनिक कॉलेज चे प्राचार्य श्री संतोष मेदगे  ,लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरॅपी  ,  लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था चे  प्राचार्या  सौ. योगिता बावगे   सर्व युनिट चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी  उपस्थित होते .

Post a Comment

أحدث أقدم