क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन

 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन


जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा जिल्हा समाज कल्याण विभागाकडून आवाहन

लातूर:क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा दि.11 एप्रिल हा जन्मदिवस महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्याचा मानस आहे. त्यानुसार दि.09.04.2023 ते  दि.11.04.2023 या कालावधीत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धाचे आयोजन या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी आधुनिक समाजनिर्मीतीमध्ये अमुल्य योगदान दिलेले आहे. स्त्री शिक्षण, बहूजन शिक्षण तसेच ज्ञाननिर्मीती याकरीता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी महत्त्वाचे कार्य केलेले आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा दि.11 एप्रिल हा जन्मदिवस महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्याचा मानस आहे. त्यानुसार दि.09.04.2023 ते  दि.11.04.2023 या कालावधीत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धाचे आयोजन या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

          महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा. निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन व विचारांवर वकृत्व स्पर्धा. मी सावित्रीबाई बोलतेय किंवा मी ज्योतिबा बोलतोय या विषयांवर एकांकिका स्पर्धा. तालुकास्तरावरील प्राथमिक /माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळेमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांचे प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार असून विजेत्यांना रोख रक्कम  , प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  देण्यात येणार आहे.
या स्पर्धा दि.09 व 10 एप्रिल तालुकास्तरावर आयोजित होणार असून लातूर व रेणापूर या तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आश्रमशाळा काटगाव तांडा ता. जि. लातूर  येथे आयोजित होणार आहेत. उदगीर व देवणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक आश्रमशाळा बोरतळापाटी ता. उदगीर जि. लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत 3.चाकूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक /माध्यमिक  व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जानवळ ता. चाकूर जि. लातूर या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत तसेच निलंगा व औसा या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक /माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा मनोहरतांडा ता औसा जि. लातूर जळकोट- प्राथमिक /माध्यमिक  आश्रमशाळा चिंचोली अतनूर ता. जळकोट जि. लातूर 6.अहमदपूर तालुक्यातील सर्व शाळा –प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा तुळशिराम तांडा ता. अहमदपूर जि. लातूर

स्पर्धेचे नियम व अटींकरीता तसेच नाव नोंदणीकरीता सबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना संपर्क करावा.

लातूर व रेणापूर या तालुक्यातील इच्छुक पालकांनी श्री. चव्हाण सर (मुख्याध्यापक)-मो.क्र.9881776413
श्री. पठाण सर – (सहशिक्षक)मो.क्र.9420770386 यांना संपर्क करावा.  उदगीर देवणी तालुक्यातील पालकांनी श्री. स्वामी सर  (मुख्याध्यापक) मो.क्र.9404946199 यांना संपर्क करावा. चाकूर तालुक्यातील पालकांनी श्री निलेश बाळासाहेब राजेमाने (मुख्याध्यापक) मो.क्रमाक  9423218393 यांना संपर्क करावा. निलंगा व औसा तालुक्यातील पालकांनी  1.प्रा. बनसोडे सर (प्राथमिक आश्रमशाळा -मुख्याध्यापक) मनोहरतांडा-मो.क्रमांक -9421378105 श्री. गायकवाड सर (माध्यमिक आ. शा. मुख्याध्यापक) मनोहरतांडा-मो.क्र.9423601882 यांना संपर्क करावा. जळकोट येथील पालकांनी 1.श्री. भिमराव शिवाजी राठोड –(मुख्याध्यापक) मो.क्र.94210935552.श्री.जय भिमराव राठेाड- (मुख्याध्यापक) मो.क्र.7519343333 यांना संपर्क करावा. अहमदपूर तालुक्यातील पालकांनी 1.श्री. जाधव सर (मुख्याध्यापक)मो.क्र.8329711306 2.श्री.डुबेवार मॅडम (मुख्याध्यापक) मो.क.्र9359462760 यांना संपर्क करावा.

इच्छुक स्पर्धकांनी त्यांची नांवे दिनांक 9 एप्रिल 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सबंधित मुख्याध्यापक यांचेकडे नाव नोंदणी करावीत तसेच स्पर्धेस येताना महाविद्यालयाचे ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी. ओळखपत्राची छायांकित प्रत स्पर्धेच्या वेळेस आयोजकांकडे जमा करावी. स्पर्धेच्या निकालाचा अंतिम निर्णय हा परीक्षकांचा असेल व तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. सर्व स्पर्धकानी अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे.

सदर स्पर्धांकरीता जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم