लोकशाही राष्ट्र निर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्त्वाचे-प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने

 लोकशाही राष्ट्र निर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्त्वाचे-प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती कार्यक्रम
लातूर -विश्व मानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विविध क्षेत्रांमध्ये कार्य आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताला लोकशाही राष्ट्र निर्माण करण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने यांनी केले.  
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील जयंती उत्सव समिती द्वारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे, आय.क्यु.एस.सी.चे समन्वयक डॉ.आनंद शेवाळे आणि स्टाफ सचिव कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.  
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या प्रतिमेला महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी त्रिशरण पंचशील दिले.  
पुढे बोलताना डॉ.दिनेश मौने म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते. ते खऱ्या अर्थाने ज्ञानाचे अथांग महासागर होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतावादाचे पुरस्कर्ते, उत्कृष्ठ प्रशासक, उत्कृष्ठ लेखक आणि जलनायक होते हे सांगून त्यांनी त्या काळामध्ये नदी जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी शेती सुधारणा कायदा सुद्धा त्यांनी केला होता. कामाचे तास ०८ तास असावे अशी त्यांची धारणा होती. कामगाराच्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार मानवतावादी होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार प्रा.धोंडीबा भुरे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. 

Post a Comment

أحدث أقدم