भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात संभाजी वायाळ यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश

 भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात

संभाजी वायाळ यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश

        लातूर - काँग्रेस कार्यकर्ते लातूर बाजार समितीचे माजी संचालकभिसे वाघोली सोसायटीचे चेअरमन संभाजीराव वायाळ आणि सरपंच सौ. स्वयंम वायाळ यांच्यासह अनेकांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुधवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या विजयात मोठी भर पडली आहे.

        यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकरभाजपाचे नेते राजेश कराडजिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदेप्रदेश भाजपाचे अमोल पाटीलजिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहरेउमेश बेद्रेसुरज शिंदेप्रताप पाटीलविश्‍वास कावळेभैरवनाथ पिसाळकाशिनाथ ढगेशरद शिंदेअरविंद सुरकुटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. वायाळ यांच्या भाजपा प्रवेशावेळी भिसे वाघोली आणि परीसरातील सोसायटीचे संचालकग्रामपंचायत सदस्य व इतर अनंकजण मोठ्या संख्येने होते.

            बाजार समितीत रमेशअप्‍पा यांच्‍यामुळेच मला काम करण्‍याची संधी मिळाली असल्‍याचे सांगून यावेळी बोलताना संभाजी वायाळ यांनी शेतक-यासाठी असलेल्‍या बाजार समितीच्‍या सभापतीपदी व्‍यापा-याची नियुक्‍ती केली. सात वर्षात कुठलेही शेतक-याच्‍या हिताचे निर्णय झाले नाहीत. येणा-या काळात शेतक-यांच्‍या हितासाठी त्‍याचबरोबर मतदार संघातील गावागावात विकास कामासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्‍ध करून दिल्‍याने आणि त्‍यांच्‍या कामाला प्रेरीत होवून आम्‍ही आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या नेतृत्‍वात काम करण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे बोलून दाखवले.

            भारतीय जनता पार्टीत नव्‍याने प्रवेश केलेल्‍या सर्वांचे स्‍वागत करून आ. रमेशअप्‍पा कराड यांनी सर्वांना सन्‍मानाची वागणूक दिली जाईल असे बोलून दाखविले. लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावत वाडी तांडयात आमदार निधी बरोबरच शासनाच्‍या विविध विभागामार्फत विकास कामासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्‍ध करून देता आला याचे समाधान असल्‍याचे सांगून लातूर ग्रामीणच्‍या आमदार महोदयाने कोणती कामे केलीकोणत्‍या गावात विकास निधी दिला असा प्रश्‍न उपस्थित केला. आजपर्यंत केवळ आडवणूकीची भुमिका घेवून सर्वसामान्‍य जनतेला देशमुखांनी वेठीस धरण्‍याचा प्रयत्‍न केला असल्‍याचा आरोप आ. कराड यांनी केला.

          भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत भिसे वाघोली येथील चेअरमन संभाजीराव वायाळसरपंच स्वयम संभाजी वायाळअशोक पाटीलबाळासाहेब मांदळेहमीद पठाणशामराव जाडकरलालासाहेब पाटीलअंकुश मनसुरेशहाजी चौगुलेसय्यद हकीमगोपीनाथ पाखरेगुणवंत शिंदेतुकाराम पानखेडेसचिन मांदळेसुधाकर वायाळजमील शेखगोपाळ काळेदिलीप भिसेपरमेश्वर शिंदेश्रीनिवास वायाळसंतोष भिसेअण्णासाहेब चौगुलेविकास आडगळेदादासाहेब वायाळबबन निलंगेअशोक पानढवळेशिवाजी निलंगेसुभाष भिसेराहुल भिसेगोविंद पानखेडेप्रदीप ढावारेबालाजी निलंगेशहाजी गायकवाडअंकुश वानखेडेआप्पासाहेब पाटीलरामेश्वर वायाळश्रीकृष्ण लकडेराजाभाऊ भिसेगणेश वानखेडेसमाधान पवारनानासाहेब भिसेश्रीकृष्ण लकडेविजयकुमार वायाळसय्यद शमशोद्दीनअशोक सावंतआदेश वायाळ यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

Post a Comment

أحدث أقدم