मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धोंडीबा सोनवणे; प्रल्हाद शिंदे उपाध्यक्षपदी

 मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धोंडीबा सोनवणेप्रल्हाद शिंदे उपाध्यक्षपदी






  लातूर/प्रतिनिधी:लातूर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धोंडीबा सोनवणे तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती हिंगले यांनी काम पाहिले.

    काही दिवसांपूर्वीच या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी निवडणूक झाली होती.शुक्रवारीदि.७ एप्रिल )निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती हिंगले यांच्या अध्यक्षतेत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड करण्यात आली.अध्यक्षपदासाठी धोंडीबा सोनवणे व उपाध्यक्ष पदासाठी प्रल्हाद शिंदे या दोघांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेचे संचालक म्हणून रवी कांबळे,मनोहर शिंदे,अक्रम शेखबंडू किसवे,रामदास शिंदे,शोभा क्षिरसागर,सिद्धार्थ मोरे यांची निवड झालेली आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी सल्लागार म्हणून रमाकांत पिडगे व कलीम शेख यांनी काम पाहिले.

Post a Comment

أحدث أقدم